एनसीसीएफ कडून कांदा खरेदी बंद? पोर्टल बंद केल्याने बाजार समित्यांमध्ये 200 रुपये कांदा दरात घसरण…

एनसीसीएफकडून कांदा खरेदी बंद ?

पोर्टल बंद केल्याने बाजार समित्यांमध्ये 200 रुपये कांदा दरात घसरण

लासलगाव:-समीर पठाण

केंद्र सरकारचा कांद्याचा खेळ…. बसेना कांदा उत्पादकांचा आर्थिक मेळ… असं काही म्हणण्याची वेळ आता कांदा उत्पादकांवर आली आहे एनसीसीएफने कांद्याची खरेदी थांबवल्याने कांदा उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन येत असल्यामुळे अल्पशी आवकेत वाढ झाली असून याचा थेट परिणाम लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण झाल्याने कांद्याचे सरासरी बाजार भाव तीन हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड,एनसीसीएफ या संस्थेच्या मार्फत पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून कांद्याची खरेदी सुरू झाली मात्र उद्दिष्ट पूर्ण होण्याअगोदरच एनसीसीएफ कडून कांदा खरेदीचे पोर्टल गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद केल्याने जिल्ह्यातील बाजार समिती मध्ये कांद्याची आवकेत अल्पशी वाढ झाल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात 3311 ते 3100 रुपये कांदा दर मिळत असतांना एनसीसीएफ चे कांदा खरेदीचे पोर्टल पुन्हा पूर्ववत सुरु न झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा दरात 200 रुपयांची घसरण झाली गुरुवारी 3100 ते 2900 रुपये इतका कांद्याला दर मिळाला आहे नाफेडची कांदा खरेदी बंद झाल्यास कांद्याचे दर आणखीन खाली येण्याची भीती या क्षेत्रातील तज्ञांकडून बोलले जात आहे

 

-एनसीसीएफ या संस्थेमार्फत कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टल बंद केल्याचे सांगितले जात आहे पण नाफेड मार्फत सुरू असलेल्या कांद्याची खरेदी 24 हजार मेट्रिक टनापर्यंत गेल्या आठवड्यात केल्याची चर्चा असताना मग एनसीसीएफ च्या खरेदीचा अडीच लाख मेट्रिक टनाचा टप्पा कसा पूर्ण झाला असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो

प्रतिक्रिया

ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून यंदा पाच लाख मॅट्रिक टन इतका कांदा खरेदी करत बफर स्टॉक केले जाणार होते लोकसभा निकालानंतर कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली मात्र कमी कालावधीत इतकी मोठी खरेदी झाली कशी,खरेदी अगोदरच एक हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव असतानाच खरेदी करत हा कांदा खरेदी केल्याचे दाखवल्या गेलेचाही संशय असल्याने कांदा खरेदीत मोठा घोटाळा झाला का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते यामुळे ईडी सीबीआय मार्फत या कांदा खरेदीची चौकशी केली जावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहे

भारत दिघोळे 
संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

एनसीसीएफ ने ज्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला अश्या शेतकऱ्यांची यादी तयार करत खरंच कांदा विक्री केला आहे का याची चौकशी केली पाहिजे यात मोठा घोटाळा झाल्याचे समोर येईल बाजार समितीच्या तुलनेत पाचशे रुपये कमी दराने कांद्याची खरेदी केली जात असताना यांना कोणता शेतकरी कांदा देईल त्यामुळे यांनी बाजार समित्यांमधून कमी दराने कांदा खरेदी करत जवळील शेतकऱ्यांच्या नावाने नोंदणी हा कांदा खरेदी केल्याचे समोर येईल

सुनील गवळी, शेतकरी ब्राम्हणगाव (विंचूर)

Bhagwat Udavant

Recent Posts

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली   काजी सांगवी ( वार्ताहर) आज सायंकाळी 7 वाजून…

2 hours ago

मोठी बातमी: सिन्नर बस स्थानकाचे छताचे शेड कोसळले

नाशिक: प्रतिनिधी सिन्नर येथे झालेल्या तुफान पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे येथील हायटेक बस स्थानकाचे प्लॉट…

7 hours ago

बांगड्या पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला जमावाने बदडले

सटाणा:  प्रतिनिधी शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या…

1 day ago

लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात नाशिक ः प्रतिनिधी जहाँ डाल डाल पे…

1 day ago

मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…

1 day ago

56 तासांनंतर जिंदाल आग आग आटोक्यात

इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…

1 day ago