नाशिक

50 लाख लिटर पाण्याची नासाडी थांबणार

शिवडे बंधार्‍यातील गळती काढण्यात नगरपालिकेला यश

सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या पाच – सहा महिन्यांपासून सुरू असलेली शिवडे बंधार्‍यातील जलवाहिनीची गळती काढण्यात नगरपालिका प्रशासनाला अखेर यश आले आहे. रविवारी गळती काढण्याचे सुरू झालेले काम सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाले. संध्याकाळी 5 वाजेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ही गळती काढल्यामुळे दिवसाकाठी किमान 50 लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे सिन्नरकरांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. नगरपालिका वाढत्या पाण्याच्या आता कसे नियोजन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिन्नर नगरपालिकेने 24 एप्रिल रोजी शिवडे बंधार्‍यातील गळती काढण्यास प्रारंभ केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हे काम थांबवण्यात आले होते. पुन्हा रविवारी (दि.28) दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस बंदोबस्तात गळती करण्याच्या कामास सुरुवात केली. बंधार्‍यातील पाणी विद्युत मोटारी टाकून आणि डोंगळ्यांच्या सहाय्याने
काढण्यात आले.
त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम सुरू होते. सोमवारी ही गळती काढण्याचे काम पूर्ण झाले, मात्र काही प्रमाणात गळती राहिल्याने पुन्हा ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण झाल्यानंतर 5 वाजता कडवा धरणातून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत मेश्राम यांनी दिली.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago