नाशिक

मोकाट जनावरांचे रस्त्यावर अतिक्रमण; वाहतुकीचा खोळंबा

मालेगाव : नीलेश शिंपी
आधीच शहरातील नागरिक अतिक्रमणामुळे त्रस्त आहेत. त्यातच रस्त्यांवर फिरणार्‍या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, वाहनचालकांसह पादचार्‍यांचे जीव धोक्यात आले आहेत. महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरातील सोयगाव मराठी शाळा ते इंदिरानगर, मोसमपूल ते अ‍ॅरोमा चित्रपटगृह, एकात्मता चौक, मार्केट परिसर, रावळगाव नाका, सोमवार बाजार, सरदार चौक, संगमेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही जनावरांचे साम्राज्यच असल्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे वाहनचालकांसह पायी चालणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
शहरात आधीच अतिक्रमणाचा विळखा आहे. तर दुसरीकडे बेशिस्तपणे उभी केलेली वाहने. यामुळे नागरिक त्रस्त असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकाट जनावरांचाही सामना करावा लागत आहे. सावधान! पुढे मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. वाहने हळू चालवा, अन्यथा अपघाताची शक्यता… अशी वस्तुस्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकासमोरील रस्त्यावरही नेहमीच मोकाट जनावरे बसलेली असतात. मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या अंगावर मोकाट जनावरे कधी धावून येतील, याचा नेम नाही. त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कचर्‍यामुळेही समस्या वाढली
शहरात कचरा टाकण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेल्या या कचर्‍यात अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येतात. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

7 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

7 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

7 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

7 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

7 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

8 hours ago