परतीच्या पावसाचा तडाखा, वाघाडीच्या पुराने व्यावसायिकांचे हाल
नाशिक ः प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस होत असताना, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर गंगापूर धरणातून 698 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारीदेखील शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर वाघाडी नाल्यातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे बुधवारच्या बाजारात अचानक पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले होते. तर गुरुवारी (दि. 18) दुपारी शहरात दुपारी तीन वाजेनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान विभागाकडून गेल्या पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, गुरुवारी सलग दोन तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. दोन तासांत 1 मिमी पावासाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. परिणामी, जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणसाठ्यांत वाढ होत असल्याने 14 धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणाचा पाणीसाठा 98.56 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून 698 क्यूसेकने विसर्ग कण्यात येत आहे. गोदाकाठच्या नागरिकांना, व्यावसायिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गोदावरीला पाणी वाढल्यामुळे वाहनचालकांनी वाहन देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गोदावरी तीरावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची मोठी अडचण झाल्याचे चित्र होते.
शहरातील सातपूर, नवीन नाशिक, महात्मानगर परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. एबीबी सर्कल, सातपूर मनपा कार्यालयाजवळ व त्र्यंबकरोडवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
धरण विसर्ग (क्यूसेक)
दारणा 850
गंगापूर 698
वालदेवी 107
आळंदी 87
भावली 135
भाम 374
वाघाड 180
पालखेड 866
नांदूरमध्यमेश्वर 6310
करंजवण 451
कडवा 840
तिसगाव 31
गौतमी गोदावरी 288
काश्यपी 160
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…