सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके ऐन काढणीला आल्यानंतर पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे आता बळीराजा सरकारकडे आशेने पाहत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसाने नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे. मोहोळ तालुक्यातील तरट गावात शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने नदी काठावरची शेती पाण्याखाली गेली. नदीकाठी असलेल्या ऊसासह केळी आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारीदेखील पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…