पालिकेतील शाळेत शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

नाशिक : प्रतिनिधी

जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणाची शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी गंभीर दखल घेतली असून सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिका यांना चोवीस तासात खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. याबाबत माहिती अशी कीं, मंगळवारी (दि.२८) कर्ण व इतर मुलाचे भांडण सुरु होते. ते सोडविण्याऐवजी गायकवाड यांनी कर्ण याला बेदम मारले. अगदी गालावर बोटाचे निशाण उमटेपर्यंत मारले. विशेष म्हणजे मुख्यध्यापिका मोहिते यांच्या दालन आवारात हा प्रकार घडला .हे प्रकरण शिक्षणाधिकारी धनगर यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी शिक्षक गायकवाड व मुख्यध्यापिका हेमलत‍ा मोहिते यांना याबाबत खुलासा मागितला असून कारवाई का करु नये? असा जाब विचरला आहे.
महापालिका शाळांमध्ये गोरगरिब विद्यार्थी शिक्षण घेतात. पण तेथील शिक्षकांचे आचरण अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत गायकवाड हे त्यांच्या नको त्या कृत्यांमुळे अगोदरच चर्चेत राहतात. विद्यार्थ्याना मारहाण करणे, उध्दटपणे वागत अरेरावी करणे अशा अनेक तक्रारी पालकांच्या आहेत.

मुख्यध्यापकासह शिक्षकाला नोटीस

चोवीस तासात खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानूसार कारवाई केली जाईल. मुख्यध्यापिका मोहिते व शिक्षक गायकवाड यांना विद्यार्थी मारहाण प्रकरणी नोटिस बजावली आहे.
सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी
मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *