नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकार्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराचा पर्यटन व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.
याशिवाय नाशिकमधील महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नाशिक विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच नाशिकची पुणे आणि मुंबईशी जोडणार्या महामार्गांच्या सहापदरीकरणावरही भर देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.
गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणार
एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्याने जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी अजितदादांच्या पश्चात अर्थसंकल्प सादर केला. काँक्रीट रस्त्यांसह मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.
पुणे शहराला काय मिळाले?
1) पुणे-लोणावळा तिसर्या व चौथा रेल्वे मार्गिकेच्या पाच हजार 100 कोटींंचा प्रकल्पास मान्यता 2) मेट्रो टप्पा दोनला मान्यता 3) रामवाडी ते वाघोली 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पालादेखील मान्यता.
मुंबईसाठी महत्त्वाच्या घोषणा
♦ अजून एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया.
♦ अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार.
♦ राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार
♦ सहा हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार.
♦ 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार.
♦ दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार.
♦ वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार.
♦ पनवेल ते कर्जत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार.
Substantial provision for Nashik Simhastha Kumbh Mela, Ozar Airport will also be expanded
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…