उपनगरला मायलेकीवर चाकूने हल्ला

 

 

संशयिताचाही आत्महत्येचा प्रयत्न

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

 

उपनगर येथील केंद्रीय विद्यालय समोर संशयिताने आइ व मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.17) घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संशयिताने महिलेवर हल्ला केल्यानंतर स्वत:वर हल्ला करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हल्ल्ला करण्यात आलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे, याबाबतची माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर संशयित सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने या परिसरातून जाणाऱ्या अर्चना बाळासाहेब वाघमारे (रा. शिवाजीनगर जेलरोड वय 34) व त्यांच्या मुलीवर चाकूने सपासप वार केलेत. यानंतर संशयित दिंगीयाने घटनास्थळावरून पळ काढला. पुढे या संशयिताने स्वतःवर चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात अर्चना वाघमारे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिकरोड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सोळा वर्षीय श्रुतीवरही संशयिताने वार करत जखमी केले असून तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हा जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असून शवविच्छेदन विभागात कार्यरत असल्याचे समजते आहे. दिवसा घडलेल्या घटेनेमुळे परिसरात खळ्बळ उडाली. जखमी संशयितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. संशयिताने हा हल्ला का केला. हे समजू शकले नसून पोलीस याआ सुगावा घेत आहेत. आर्थिक देवाण घेवाणीवरुन संशयित आणि महिलेत भांडण होत असल्याची चर्चा आहे. परंतु याप्रकरणी अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *