ऑक्सिजन सिलिंडरच्या साथीने मिळवले दहावी परीक्षेत यश
शहापूर : साजिद शेख
निरोगी आयुष्याबरोबर प्रयत्न करून मिळवणे सोपे असते मात्र आरोग्याबाबत असणाऱ्या अडचणीवर मात करत यशाचे शिखर गाठणे मोठ्या आव्हान असते. हेच आव्हान कल्याण मधील माही देशवंडीकर हिने स्वीकारत आपले स्वप्न सत्यात उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. गंभीर आजार मानला जाणारा सिस्टिक फायब्रोसिस या आजाराशी झुंज देत, ऑक्सिजन सिलिंडर सोबत ठेवून दहावीची परीक्षा दिलेल्या माहीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत तब्बल ८६ टक्के गुण मिळवले आहेत.
माही कल्याणमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते. ती सीआरएम ओक हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिला सिस्टिक फायब्रोसिस हा आजार झाला आहे. या आजारामुळे फुफ्फुस, स्वादुपिंड आणि इतर अवयवांमध्ये चिकट, जाड म्युकस तयार होतो. ज्यामुळे तिची शारीरिक अवस्था अत्यंत नाजूक बनली आहे. घराबाहेर पडणेही धोकादायक असल्यामुळे माही गेल्या दोन वर्षांपासून शाळेत जाऊ शकलेली नाही. त्यामुळे तिने होम स्कूलिंगचा मार्ग स्वीकारला. तिच्या आई शर्मिला देशवंडीकर यांनी सांगितले की, शिक्षणावरील प्रेम आणि चिकाटी कायम ठेवत माहीने घरातूनच अभ्यास सुरू ठेवला. व्हिडिओ कॉलद्वारे शिक्षकांशी संपर्क साधत, युट्युबवरील व्हिडिओंच्या माध्यमातून विषय समजून घेत आणि शंका दूर करण्यासाठी आईची मदत घेत तिने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला.
माही स्वतःच प्रश्न सोडवायची काही अडचण आल्यास शंका दूर करण्यासाठी आईची मदत घेत शिक्षकांपर्यंत पोहचत होती. शंका असलेले प्रश्न माही एका पेपरवर लिहून काढत होती. ते प्रश्न माहीची आई शिक्षकांकडे घेऊन जात असे त्यावेळी शिक्षक व्हिडिओ कॉलवरून माहीला प्रश्न समजावून सांगायचे. तसेच दहावीच्या परीक्षेच्या अगोदर माही तब्येतीमुळे दहा ते बारा दिवस रुग्णालयात दाखल होती. मात्र परीक्षा देताना तिच्यासाठी विशेष बसण्याची आणि लेखनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तिचे शरीर तिला साथ देत नसल्याने परिक्षेवेळी माहीचे आई वडील तिला परिक्षा खोलीपर्यंत उचलून घेऊन जात होते. परिक्षे दरम्यान, माहीने ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन परीक्षा दिली. माहीचा प्रेरणादायी प्रवास केवळ गुणांच्या मर्यादेत न राहता, अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत ठरले आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…