आस्वाद

यश, धडपड, न्यूनगंड, सातत्य

विषय कुठलाही असू द्या, स्वप्न कुठलंही असू द्या, ते पूर्ण करताना त्या माणसाने किती गोष्टी अनुभवल्या आहेत, हे फक्त त्याचे त्यालाच माहीत असतं. एखादी यशस्वी व्यक्ती समोर बघणं, तिला आदर्श मानणे, तिचं कौतुक करणं अगदी सोपं, पण त्या एका यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी किती पायपीट केली आहे ते फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असते.
असं म्हणतात, अपयश यशाची पहिली पायरी मान्य आहे, पण कित्येक वेळा यश आणि अपयश यांच्यामधल्या काही दोन-तीन विषयांनीसुद्धा माणूस हरवून जातो. अगदी हतबल होतो. नकारात्मक विचार करायला लागतो आणि स्वप्नांपासून भरकटू शकतो.
उदाहरणार्थ असे बरेच प्रोफेशन आहेत, तिची डिग्री तर मिळून जाते. त्या डिग्रीपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत विद्यार्थ्याने केलेली असते, पण त्यानंतर प्रॅक्टिस हा प्रकार बर्‍याच
प्रोफेशनमध्ये आहे. जसे की, डॉक्टर, वकील, मेडिकल फील्ड या प्रोफेशनचा समाजात इतका असा मोठा नावलौकिक आहे, एक वेगळाच दरारा आहे. मात्र, यात प्रॅक्टिस हा भाग कधीकधी इतका किचकट आणि अवघड होऊन जातो की, त्यातून आपण कधी पैसे उभे करणार आणि स्वतःची स्वप्न साकार करणार असं होऊन जातं.
अशी मोठी डिग्री घेऊन विद्यार्थी बाहेर पडतो ती आपली स्वप्न रंगवण्यासाठी. त्याचवेळी प्रॅक्टिसच्या दरम्यान त्याला एक चांगला सीनिअर भेटणं, त्या सीनिअरने चांगलं मार्गदर्शन करणं ते सीनिअरच्या ऑफिसमध्ये त्या विद्यार्थ्यासोबतच शिकणार्‍या इतर लोकांनीही सहकार्य करणं, हा खूप महत्त्वाचा भाग होऊन जातो. त्या सर्व गोष्टी सांभाळून आपली प्रॅक्टिस उत्तमरीत्या पार पाडणं, अनेक वेळा न्यूनगंड येणार, कधीकधी पाय खेचले जाणार, कधी राजकारण होणार, असे अनेक अनुभव यामधून येतात.
आता तुम्ही म्हणाले इतका मोठा प्रोफेशन आणि त्यात यश मिळवायचे तर धडपड नको का? धडपड, मेहनतही केलीच पाहिजे. स्वप्न साकार करण्यासाठी माणसाने लढलेच पाहिजे, पण कधीकधी आर्थिक बाब ही अतिशय महत्त्वाची ठरते. आजच्या तरुण पिढीकडून आवाजी अपेक्षा केल्या जातात. मग ते पालक असो किंवा त्यांच्या लग्नाच्या बाबतीत समोरच्या पक्षाची मंडळी असो.
मुलगा 28 व्या वर्षी घर, गाडी घेण्याइतका कॅपेबल असावा. आपल्या मुलीचे स्वप्न साकार करणारा असावा, असे अनेक पालकांच्या अपेक्षा असतात. पण ज्या वयात त्याला प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागतो त्यावेळेस तो पैसे कुठून उभे करणार आणि आपली आणि दुसर्‍याची स्वप्न साकार करणार आहे? या साध्या गोष्टी काही लोकांना समजत नाहीत. मुली या प्रोफेशनमध्ये असताना प्रॅक्टिस करते म्हणून तिचं लग्न होऊनही जातं, पण मुलांचा मात्र इन्कम सोर्स काय, हे विचारून नेहमीच त्यांना पाठीमागे खेचलं जातं. त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा या प्रॅक्टिसमधून पैसा कसा उभा करावा असा प्रश्न असतो.
कधीकधी तर वाटतं की, या प्रोफेशनमध्ये डिग्रीसाठी आधीच बरीच मेहनत घ्यावी लागते आणि कायदे हाताखालून डोळ्याखालून घालावे लागतात, परीक्षा अवघड असते. डॉक्टर किंवा वकील होण्याआधी दोघांनाही सीईटी हा प्रकारसुद्धा द्यावा लागो आणि पुन्हा डिग्री घेतल्यावर निदान प्रॅक्टिस. यादरम्यान तरी मुलांना काहीतरी इन्कम सोर्स असावा, त्यांना योग्य ठिकाणी योग्य असे प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण देण्यात यावं जेणेकरून ते आपला आर्थिक उदरनिर्वाह स्वतःच्या मेहनतीतून साकार करू शकतील. मेहनत, चिकाटी यांची भर तुमच्या स्वप्नात नक्की असावी, पण त्यासोबत जर तुम्ही एखादा प्रोफेशनमध्ये जाण्याचा विचार करता तर तुम्हाला सातत्य आणि नकारात्मकतेतून सतत सकारात्मक उचलून घेण्याची ताकददेखील ठेवावी लागेल. कारण समाजाला फक्त यश आणि अपयश या दोन पायर्‍या दिसतात. मात्र, या दोन पायर्‍यांच्या मधे असणारा खडतर प्रवास हा फक्त त्या स्वप्नांच्या पाठी धावणार्‍या व्यक्तीलाच माहीत असतो.

Success, struggle, humility, consistency

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago