सटाणा : प्रतिनिधी :
बागलाण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वटार गावातील विंचुरे शिवारात घडली आहे. जिभाऊ नामदेव खैरनार (वय 45 ) असे या तरुण शेतकर्याचे नाव आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी जिभाऊ खैरनार हे आपली पत्नी व मुलांसोबत शेतात राहत होते. त्यांची स्वतःची दिड एकर शेती होती.त्यांत कांदा काढणी होऊन एक ते दीड महिना उलटूनही समाधानकारक भाव मिळत नाही, भाव मिळतो तो फक्त 500 ते 600 सहाशे असा अल्प दर मिळत असल्यामुळे जवळ जवळ साडेचार ते पाच लाख कर्ज फेडायचे कसे ,त्यात जी जमीन आहे ती गहाण ठेवली आहे, दुसरे व्याजाचे व हातउसनवार घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवेवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत जिभाऊ खैरनार यांनी जीवन संपवले. शासकीय आरोग्य रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.शोकाकूल वातावरणात जिभाऊ खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सटाणा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.