नाशिक

पत्नीवर चाकूने वार करुन पतीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

नाशिक : कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार करुन पतीने तिसर्‍या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
राजू रतनसिंग ठाकूर (50) रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्णनगर मखमलाबाद शिवार यांचा त्यांची पत्नी संध्या ठाकूर हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. भांडण विकोपाला गेल्याने राजू ठाकूर यांनी पत्नीवर चाकूने वार केले. आणि स्वत: तिसर्‍या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत जाऊन खाली उडी घेतली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, उपचारार्थ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी  पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

6 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

6 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

6 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

7 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

7 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

7 hours ago