इगतपुरीकर त्रस्त; दुचाकीस्वारांना म्हशींची अनेकदा धडक
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहर व परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत आहे. चरण्यासाठी रस्त्यावरून जाणार्या म्हशींमुळे पादचार्यांसह दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. जनावरांच्या धक्क्याने कोणी जखमी झाल्यास त्यास जबाबदार कोण? म्हणून नगरपरिषद प्रशासनाने अशा जनावरे मालकांना तंबी देऊन त्यांच्याकडून दंड आकारण्यास यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास कोणीतरी पिकअप व्हॅनमधून सुमारे 30 ते 40 हून जास्त मोकाट कुत्री सोडल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शहरात गेल्या पाच दिवसांपूर्वी पिकअप वाहनातून शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गाजवळ ही कुत्री रात्रीच्या सुमारास सोडल्याचे बोलले जात आहे.
वाहनातून कुत्री सोडताच या कुत्र्यांनी थेट शहरातील गल्लीबोळ गाठले. त्यामुळे शहरातील कुत्री व ही मोकाट कुत्री यांच्यात पहाटेच संघर्ष झाला. 10 ते 12 कुत्र्यांचा जमाव गटागटाने भांडू लागल्याने साखरझोपेत असलेल्या इगतपुरीकरांची झोपमोड झाली. डोळे चोळतच उठलेले नागरिक भल्या पहाटेच एवढा मोठा कुत्र्यांचा जथा पाहून आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, मध्यंतरी पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे अनेक नागरिकांना चावा घेण्याच्या घटना ताज्या असतानाच आता एवढ्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्री गावात आल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
अगोदरच शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. आता या नवीन पाहुण्यांची भर पडली आहे. त्यामुळे घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं, अशी अवस्था इगतपुरीकरांची झाली आहे.
निवडणूक जवळ आल्याने खोडसाळपणा?
इगतपुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने कोणीतरी खोडसाळपणा करून ही मोकाट कुत्री सोडल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आम्ही निवडून आलो, तर गावाचा विकास करू, असे आश्वासन देत काहींनी प्रचारदेखील सुरू केला आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…