नाशिक

कुत्र्यांच्या संख्येत अचानक वाढ; घरचं झालं थोडं…

इगतपुरीकर त्रस्त; दुचाकीस्वारांना म्हशींची अनेकदा धडक

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहर व परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत आहे. चरण्यासाठी रस्त्यावरून जाणार्‍या म्हशींमुळे पादचार्‍यांसह दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. जनावरांच्या धक्क्याने कोणी जखमी झाल्यास त्यास जबाबदार कोण? म्हणून नगरपरिषद प्रशासनाने अशा जनावरे मालकांना तंबी देऊन त्यांच्याकडून दंड आकारण्यास यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास कोणीतरी पिकअप व्हॅनमधून सुमारे 30 ते 40 हून जास्त मोकाट कुत्री सोडल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शहरात गेल्या पाच दिवसांपूर्वी पिकअप वाहनातून शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गाजवळ ही कुत्री रात्रीच्या सुमारास सोडल्याचे बोलले जात आहे.
वाहनातून कुत्री सोडताच या कुत्र्यांनी थेट शहरातील गल्लीबोळ गाठले. त्यामुळे शहरातील कुत्री व ही मोकाट कुत्री यांच्यात पहाटेच संघर्ष झाला. 10 ते 12 कुत्र्यांचा जमाव गटागटाने भांडू लागल्याने साखरझोपेत असलेल्या इगतपुरीकरांची झोपमोड झाली. डोळे चोळतच उठलेले नागरिक भल्या पहाटेच एवढा मोठा कुत्र्यांचा जथा पाहून आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, मध्यंतरी पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे अनेक नागरिकांना चावा घेण्याच्या घटना ताज्या असतानाच आता एवढ्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्री गावात आल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
अगोदरच शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. आता या नवीन पाहुण्यांची भर पडली आहे. त्यामुळे घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं, अशी अवस्था इगतपुरीकरांची झाली आहे.

निवडणूक जवळ आल्याने खोडसाळपणा?
इगतपुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने कोणीतरी खोडसाळपणा करून ही मोकाट कुत्री सोडल्याची चर्चा आहे. निवडणुकीत आम्ही निवडून आलो, तर गावाचा विकास करू, असे आश्वासन देत काहींनी प्रचारदेखील सुरू केला आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago