नांदगावमधून महायुतीकडून सुहास कांदे  , समीर भुजबळांसाठी महायुतीचे दरवाजे बंद

नांदगावमधून महायुतीकडून सुहास कांदे

समीर भुजबळांसाठी महायुतीचे दरवाजे बंद

नांदगांव :  महेंद्र पगार

महायुतीत सहभागी असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारी यादी मंगळवार दि २२ रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली असून नांदगाव मधून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पक्षाने पुन्हा विश्वास दाखवत उमेदवारी बहाल केली आहे यामुळे आमदार सुहास कांदे यांचा नांदगांव मधून उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

महायुतीच्या कोट्यातून नांदगाव विधानसभेची जागा ही शिंदे गटाला सोडण्यात आली होती मात्र या जागेवर अजित पवार गटाकडून देखील दावा सांगितला जात होता मात्र शिंदे गटाने येथून उमेदवार जाहीर केल्यामुळे आता येथून महायुतीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या समीर भुजबळ यांचा उमेदवारीचा मार्ग बंद झाला असला तरी अशा परिस्थितीत समीर भुजबळ आता काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून आहे,

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर नांदगाव मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी समीर भुजबळ हे प्रयत्नशील होते नांदगावची जागा शिंदे गट ऐवजी अजित पवार गटाला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाकडून राजकीय खलबत्त सुरू होती मात्र शिंदे गटाने पहिली यादी जाहीर करत मालेगाव बाह्य मधून दादा भुसे तर नांदगाव मधून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना तिकीट देऊन अजित पवार गटातील उमेदवारांच्या मनसुबेवर पाणी फिरले असले तरी देखील आता समीर भुजबळ आता काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.समीर भुजबळ यांनी या आधीच नांदगाव मधून आपण निवडणूक लढवणारच असा चंग बांधला असल्याने उमेदवारीसाठी ते महाविकास आघाडी जातील का हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचे ठरणार आहे या सर्व बाबी पाहता नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरण कशी बदलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

अजित पवार गटाची निराशा

नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिंदे गट ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार ) गटाला सोडण्यात यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वीच समीर भुजबळ यांच्यासह काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी धडक देत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी केली होती. मात्र आता शिंदे गटाच्या वाट्याला असलेल्या या जागेवर सुहास कांदे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले समीर भुजबळ त्यांच्या पदरी निराशा पडली असली तरी आता ते महायुतीच्या विरोधात बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गट किंवा ठाकरे गटाचे शिवबंधन हातात बांधत आपली उमेदवारी करतील का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे

समीर भुजबळ मविआ कडून उमेदवारी करण्याच्या चर्चेला उधाण

समीर भुजबळ नांदगाव मधून उमेदवारी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची मोठी चर्चा सुरू असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जागेवर समीर भुजबळ यांनी उमेदवारी केली तर उभा टाचे गणेश धात्रक यांच्या उमेदवारीचे काय असा प्रश्न देखील पडणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाकडून गणेश धात्रक हेच महाविकास आघाडीचे नांदगांव मधून उमेदवार असतील अशी घोषणा देखील केली आहे त्यामुळे या मतदारसंघातून गणेश धात्रक हे उमेदवारी करतील का? आव्हान दिले जाईल हे देखील काही दिवसात होईल समीर भुजबळ या मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *