लढणार , भिडणार आणि जिंकणारच!
दिनकर पाटील यांचा निर्धार
नाशिक: प्रतिनिधी
भाजपाने अकरा वर्षात स्थायी समिती सभापती करतो, महापौर करतो,खासदारकीची उमेदवारी देतो , आमदारकीची उमेदवारी देतो असे आश्वासन दिले मात्र प्रत्येकवेळी पक्षाने डावलले त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो असा शाब्द दिला तरी माघार घेणार नाही लढणार , भिडणार आणि जिंकणारच असा निर्धार माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मंगळवार दि 22 रोजी आयोजित मेळाव्यात केला.
यावेळी व्यासपीठावर काकडे महाराज, फारुख पठाण, फिरोज पठाण, अरुण नागरे, जितेंद्र येवले, वालेराज महाराज ,विष्णु धिवरे, नीलेश भंदूरे, शैलेश शेलार ,मधुकर खांडबहाले, विठ्ठल अहिरे, लता पाटील अमोल पाटील उपस्थित होते.
दिनकर पाटील म्हणाले, पक्षाच्या आदेशाने तीन वर्ष खासदारकीसाठी तयारी केली. लोकसभा मतदार संघातील 700 गांवात चार चार वेळा दौरे केले. पण युती धर्म पाळत माघार घेतली. त्यावेळी चंद्रकांत बावनकुळे म्हणाले विधानसभेची तयारी करा आदेशानुसार तयारी केली भाजपच्या हिंदुत्वला साजेशी मंदिर बांधली, धार्मिक कार्यक्रम घेतली, मतदार संघात अनेक विकास कामे केली. तरीदेखील पक्षाने उमेदवारी नाकारली हा अन्याय आहे. सीमा हिरे यांनी सभामंडप बांधणे आणि उद्यानात खेळण्या बसवण्या पलीकडे काही काम केले नाही. मतदार संघात आयटी पार्क, उद्योग आणायचे आहेत म्हणून आमदार व्हायच असे ही दिनकर पाटील म्हणाले.
भाजपाने अजून विचार करावा आणि नाशिक पाश्चिम विधानसभा मतदार संघात पक्षाचा एबी फॉर्म मला द्यावा असे आवाहन ही दिनकर पाटील यांनी केले.
सीमा हिरे यांनी घेतली दिनकर पाटील यांची भेट
सीमा हिरे काल सकाळीच निवासस्थानी येऊन भेट घेतल्याची माहिती ही पाटील यांनी निर्धार मेळाव्यात दिली. मात्र सीमा हिरे यांना सांगितले की माझे मतदार जे म्हणतील तेच निर्णय घेण्यात येईल..माझे मतदार मला निवडणूक लढण्यास संगत आहेत म्हणून मी निवडणूक लढविणार असे पाटील म्हणाले.