महायुतीकडुन अखेर सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर
समीर भुजबळ यांच्या भूमिकेकडे लक्ष
मनमाड(प्रतिनिधी):- नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटक असलेल्या सुहास कांदे किंवा समीर भुजबळ यांच्यापैकी महायुती कडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून उलट सुलट चर्चा सुरू होत्या मात्र काल रात्री यावर शिक्कामोर्तब झाले शिंदे गटाची पाहिली यादी जाहीर झाली या यादीत सुहास कांदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात काल अखेर सुहास कांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेची पाहिली यादी जाहीर केली या यादीत कांदे यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा उद्रेक करत थेट देवगिरी बंगला गाठत अजित पवार यांना साकडे घातले होते मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे आता समीर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याशिवाय आज महाविकास आघाडीचीही यादी जाहीर होणार असुन दुपारी साडे बारा वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे यात ते आपल्या उमेदवारी याद्या जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नांदगाव तालुक्यातील लढाई आता अत्यंत चुरशीची होणार असुन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांना उमेदवारी मिळणार आहे आज दुपारी साडेबारा वाजता याबाबत निर्णय येईल सर्वांचे लक्ष आता दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
समीर भुजबळ तुतारी किंवा मशाल हाती घेणार…?
महायुती मध्ये घटक पक्ष असलेल्या अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे महायुती तर्फे उमेदवारी मिळाली नसल्याने गेल्या अनेक दिवसापासुन समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत अशा बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत याबाबत तालुक्यात चर्चा देखील सुरू असुन याबाबत आता दुपारी महाविकास आघाडीच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत निर्णय होईल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनमाडला गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त धात्रक यांची उमेदवारी जाहीर केली होती आज काय होईल हे आता दुपारी साडेबारा वाजता स्पष्ट होईल.
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…
येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…