इंदिरानगर| वार्ताहर | इंदिरानगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे . यात एक तरुणी असून एक महिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फिया इब्राहिम पिंजारी( वय- 17 वर्षे, रा. मुमताज नगर, वडाळा गाव ) हिने लोखंडी अँगलला सुती ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर खरोटे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत कविता शरद धंदर (वय – 35 वर्षे, रा. सिद्धी संकुल, म्हाडा कॉलनी, पाथर्डी गाव ) यांनी राहत्या घरी बेडरूम मधील छताला असलेल्या पंख्याला नायलॉन पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास सपोउनि दौलत पाळदे करत आहे.
ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात तरुणीसोबत जे घडले ते भयानकच शहापूर: साजिद शेख जाहिरातीला…
उदघाटनापूर्वीच करंजवन - मनमाड पाईपलाईन फुटली खेडगावजवळ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.. मनमाड : आमिन शेख मनमाड…
नाशिक प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली…
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…