ऋण वैर हत्या। हे तो न सुटे नेंदिता ॥1॥ हें कां नेणो पांडुरंगा। तुम्ही सांगतसां जगां ॥ध्रु.॥ माझा संबंध तो किती। चुकवा लोकांची फजिती ॥2॥
तुका म्हणे याचि साठी। मज न घेतां नये तुटी ॥3॥
याचा अर्थ आहे ऋण वैर आणि हत्या या गोष्टी आत्महत्या, ईश्वराने पुरस्कार स्वरूप दिलेल्या याच देहाला, कुठल्या तरी भयंकर तणावाच्या क्षणात, क्षणार्धात संपवणे….म्हणजे काय?
जगात सर्वत्र समस्यांवर निदान आहे, फक्त वेळेशीर मिळत नाही पण संयमाने शोधल्यावर नक्कीच मिळते. आजकाल हेच प्रस्थ फार माजलंय. हा शब्द ऐकल्याबरोबर मनात तीव्र वेदना उमटते. आत्महंता म्हणजे स्वतःच्याच अस्तित्वावर प्रहार करणारा. आत्महत्या ही केवळ देह संपवणे नव्हे तर माणूस आपल्या स्वतःच्या मूल्यांना, संस्कृतीला आणि देशाच्या भविष्यालासुद्धा हानी पोहोचवतो.
पुराणात आत्महत्येची कल्पना कर्म आणि धर्म यांच्याशी जोडली आहे. कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन हतोत्साहित होत होता आणि श्रीकृष्णाला आळवत होता की, माझ्या आप्तेष्टांचा वध माझ्या हातून होण्याऐवजी मीच स्वतः आत्महत्या केली तर काय वाईट आहे… त्यावेळेस भगवद्गीतेत श्रीकृष्ण त्याला उद्देशून बरेच उपदेश करतात पण त्यात हेही सांगतात की, आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. स्वतःचा नाश करणे म्हणजे ईश्वर प्रदत्त देहाचा अपमान करणे. अनेक पुराण कथांमधून असा उल्लेख आहे की, स्वतःच्या लोभामुळे किंवा अहंकारात व्यक्ती स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देतो. रावणाचा वध यामुळेच झाला आणि कौरव आपल्या अहंकाराला बळी गेले. अनेकवार माणूस स्वतःच आपल्या आत्महत्येस आमंत्रित करत असतो. नैतिक मूल्ये ढासळली, अहंकार बळावला, इच्छांना ऊत आला की मानव आत्महत्येच्या वाटेवर पुढे सरकत जातो. कुठल्याही साम्राज्याचे पतन म्हणजे आत्महत्या. ते संपूर्ण साम्राज्य
स्वतःला संपवते. रोमन साम्राज्याचे पतन यामुळेच झाले. भारतीय काही राज्यांची अधोगती, त्यांच्या अंतर्गत कलहामुळे झाली. इतिहास शिकवतो की बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत दुर्बलता अधिक घातक असते.
आत्महत्या प्रवृत्ती तेव्हाच बळावते जेव्हा आत्महंत्याला त्या क्षणी दुसरा काहीच पर्याय दिसत नाही, सुचत नाही. सामाजिक भय आणि आप्तेष्टांची भीती, अब्रूचा प्रश्न आणि सर्वांच्याच दृष्टीतून खाली पडण्यापेक्षा, आत्महत्या करून, आपली इहलीला संपवण्यात स्वारस्य वाटते. तो क्रूरतम क्षण, अगदी क्षणभरच असतो आणि आत्महत्येचा तो जघन्य निर्णय तेव्हाच घेतल्या जातो. आपले जन्मदाते, आपले आप्तेष्ट, आपली कर्तव्ये, आपण कशासाठी जन्म घेतला? आपण कोण? आपले संस्कार, संस्कृती, सभ्यता, जात, कूळ सर्व एका क्षणाला विस्मृत करून हा निर्णय घेण्यात येतो आणि त्याचे प्रायोगिक झाल्यानंतर….कदाचित पश्चात्ताप होतही असेल पण….वेळ निघून गेलेली असते. साहित्यिकांनी अनेक कथा-कादंबर्यांमधून आत्महत्येची वेदना व्यक्त केली आहे. शेक्सपियरच्या शोकांतिकेत, मराठी संतसाहित्यात जीवन संघर्ष, दुःखांत नाटकात ही वेदना, कारुण्य हे आत्मग्लानी निर्माण करते. राजकीय क्षेत्रात आत्महत्येचे अनेक कारणं आहेत. सत्तालोलूप लोक, सत्तेसाठी स्वतःचा कुणाला वाटेल तसा वापर करू देतात पण तरीदेखील अभिप्रेत पद न मिळाल्यास ते हताश होऊन आत्महंता होतात. भ्रष्टाचार, अन्याय खूप बळावले की राज्यकर्ते लोकहित विसरतात आणि समाजाचा विश्वास ढासळतो. सुशासन जेव्हा कुशासन बनते तेव्हा ते आत्मघाती ठरते. एकाकीपण, तणाव, आर्थिक असमानता हे आत्महत्येच्या मुळाशी आहेत. आधुनिक काळात स्पर्धा, नोकरीत चढाओढ, आपसात धोके बाजी हे आत्महत्येस प्रवृत्त करतात. गरिबी, बेरोजगार, आणि कर्जबाजारी हे अनेकांना निराशेच्या टोकाला नेतात. शेतकर्याच्या आत्महत्या तर आता भयानक त्रासदायक झाल्या आहेत.
आजच्या अंतरजालीय दुनियेत सर्वांत जास्त ऑनलाइन खेळ आणि तज्ज्ञ ठक फारच सक्रिय आणि हुशार झाले आहेत. नवधनाढ्य आणि व्यवहारात कमकुवत असलेली तरुणाई अशा धोक्यात सहजच सापडतात आणि त्यांच्या कह्यात आतपर्यंत फसल्यावर काहीच पर्याय दिसत नाही आणि आत्महत्येस प्रवृत्त होतात. कही दिवसांपूर्वीच शेजारचा एक बावीस वर्षांचा कोवळा मुलगा, अशाच लोकांच्या तावडीत सापडला. दिल्लीत छान नोकरीत असलेला, एकुलता एक तरुण, विच्छिन्न अवस्थेत, शवपेटिकेतून घरी आला….आई-वडिलांवर काय बेतले हे कुणीच अनुभवू शकत नाहीत.
निसर्गसुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतो. उंच पर्वत कोसळणे, मोठी झाडे कोलमडून पडणे, सागर आपली मर्यादा विसरून ‘सुनामी’ येणे या सर्वच निसर्गाची आत्महत्या नव्हे काय. आफ्रिकेत मोठे हत्ती, एका वयानंतर स्वतःच एका निश्चित जागी पोहोचतात आणि प्राणत्याग करतात. आजही आपण जंगल तोडून, प्रदूषण वाढवून भविष्याचा ठेवा नष्ट करत आहोत. पर्यावरणाचा नाश हा हवामान पालटून टाकेल. आपल्या अपत्यांवर आपण आत्महत्येस प्रेरित करण्याचा अन्याय तर करत नाही ना..?
suicide
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…