इंदिरानगर ः सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरात शिक्षणाच्या सप्तपदीतून नवागतांचे स्वागत करताना किशोर जाधव, अध्यक्षा रत्नाबाई काळे, सरचिटणीस संजय काळे, कोषाध्यक्ष ललिता काळे व मुख्याध्यापक नितीन पाटील आदी.
इंदिरानगर : वार्ताहर
येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिर या शाळेत नवागतांचे स्वागत अभिनव पद्धतीने करण्यात आले. जी चिमुकली पावलं शाळेकडे कधी वळाली नव्हती ती आज शाळेच्या ओढीने आणि औत्सुक्याने शाळेच्या प्रांगणात दाखल होणार होती. त्यामुळे त्यांचा पहिल्या दिवसाचा अनुभव कायम लक्षात राहावा यासाठी या नवागत विद्यार्थ्यांची शिक्षणाची सप्तपदी घेण्यात आली.
नवागतांना औक्षण करून त्यांना गुलाबाचे फूल देऊन संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, कोषाध्यक्ष ललिता काळे यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कृषी अधिकारी किशोर जाधव, सरचिटणीस संजय काळे व मुख्याध्यापक नितीन पाटील आदी उपस्थित होते.
इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका मनीषा बोरसे यांनी मुलांना नवीन पाठ्यपुस्तक वाटप केले. स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन अनिता अहिरे व रेखा बागूल यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सरला सोनवणे, सुचिता कन्सारा, कविता पवार, सुनील जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, मीना गोडे, प्रज्ञा पाटील या शिक्षकवृंदासह नंदकुमार झनकर, श्रीमंत डंबाळे या कर्मचार्यांंनी परिश्रम घेतले.
अशी होती सप्तपदी
न नम्रता
वा वक्तशीर
ग गतिशील
त तत्पर
स्वा स्वावलंबी
ग ग्रहणशील
त तेजस्वी
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…