नाशिक

सुनील कडासने, उपायुक्त अमोल तांबे, खरात यांची बदली

सुनील कडासने, उपायुक्त अमोल तांबे, खरात यांची बदली
नाशिक : प्रतिनिधी
शासनाने आज पोलीस उपायुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर येथे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय उपायुक्त अमोल तांबे यांची पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. उपायुक्त विजय खरात यांची सहायक पोलीस महानिरीक्षक दक्षता पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर शर्मिष्ठा वालावलकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मालेगावचे अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची नाशिकमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
शासनाने आज या बदल्यांचे आदेश काढले.
नाशिक : गुन्हे अन्वेषन विभागाच्या अधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे इप्पर मंचक ज्ञानोबा यांची शासनाने नियुक्ती केली आहे. शासनाने आज बदल्यांचे आदेश काढले. त्यांची अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago