रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात

रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या
पुरवठा अधिकाऱ्यास पकडले
खासगी एजंटही जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
गावातील 60
रेशनकार्ड काढून देण्यासाठी प्रती रेशनकार्ड 500 रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये लाचेची मागणी करत त्याबदल्यात चार हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी इगतपुरी येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी व खासगी एजंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ललित सुभाष पाटील (पुरवठा निरीक्षण अधिकारी, इगतपुरी) आणि सोमनाथ टोचे रा. भरवीर, ता. इगतपुरी असे या लाचखोरांचं नावे आहेत.
तक्रारदार हे त्यांच्या गावातील 60 रेशनकार्ड काढून देण्यासंदर्भात पुरवठा विभागातील अधिकारी ललित पाटील व गोसावी यांना भेटले होते. त्यांनी खासगी इसम सोमनाथ टोचे यांच्या समक्ष प्रत्येक रेशनकार्ड ला 500 रुपये याप्रमाणे दर ठरवून 4 हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित 26 हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार माळी, विनोद चौधरी, विलास निकम, अनिल गांगोडे, संतोष गांगुर्डे, विनोद पवार, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचेच्या रकमेपैकी चार हजार ललित पाटील यांना यापूर्वीच पोच झाले असून, 10 हजार खासगी इसम टोचे याने स्वीकारल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

एक लाख सत्तर हजारांच्या लाचेची मागणी इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात नाशिक: प्रतिनिधी सीसीटीव्ही…

2 hours ago

सिन्नर तालुक्यात वीज पडून एक गाय, दोन शेळ्या ठार

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यात सोमवारी (दि.12) दुपारनंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटांसह अवकाळी…

3 hours ago

शहरात भोंगे वाजले, पण कोणी ऐकलेच नाही

नाशिक : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाली असली, तरी संरक्षण विभागातर्फे संरक्षणाची सर्व प्रक्रिया…

3 hours ago

प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडावे

अतिरिक्त आयुक्त नायर : गोदावरी उपसमितीच्या बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी गोदावरी व तिच्या उपनद्या…

3 hours ago

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राला जशी सांस्कृतिक परंपरा आहे तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, ती…

3 hours ago

विहिरीत पडलेल्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले

चांदवड : वार्ताहर तालुक्यातील पारेगाव येथे एका 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग…

4 hours ago