महाराष्ट्र

कोकाटेंना सर्वोच्च दिलासा! आमदारकी कायम राहणार

कोकाटेंना सर्वोच्च दिलासा! आमदारकी कायम राहणार

मुंबई:

शासकीय कोट्यातील सदनिका  गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसद्वारे जारी केले आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी  विसे मळा भागा मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी कमी उत्पन्न आणि घर नसल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण १९९५-९७ चे आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रथम न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली, जी सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता सर्वोच्च न्यायालय कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

Manikrao Kokate suprim court

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago