महाराष्ट्र

महागाईवर काय बोलल्या… सुप्रिया सुळे

महागाईवर काय बोलल्या खासदार सुप्रिया सुळे

द्वारका वार्ताहर

महागाईवर वेळीच नियंत्रण न आणल्यास श्रीलंका व पाकिस्तान सारखी परिस्थिती होण्याची वेळ लागणार नाही अशी भीती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली
खा.सुप्रिया सुळे यांची सी.ए.भवनला भेट देत विविध विषयांवर संवाद साधला,

खासदार सुप्रिया सुळे काल नाशिक दौऱ्यावर होत्या.त्यांनी नाशिक येथील चार्टट अकाऊंटट व संघटनेतील पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
भाषणाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर त्यांनी देशातील महागाई विषयी बोलताना सांगितले आज श्रीलंका व पाकिस्तान व इतर काही देशांमध्ये महागाई वाढल्यामुळे, काय त्रास होत आहे, असा त्रास आपल्या देशात होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवले पाहिजे व महागाईचा विचार करून ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.तसेच या संवादात आयकर, जीएसटी व व्यवसायातील विविध मुद्यांवर गहन चर्चा करण्यात आली. व्यवसायांमध्ये येणाऱ्या विविध अडचणी व त्यामध्ये विविध प्रस्ताव व उपाय या वर नाशिकच्या चार्टर्ड अकाउंटंट यांनी त्यांचे मुद्दे मांडले. सुप्रिया सुळे यांनीही आश्वासन दिले कि हे सर्व मुद्दे संसदेत चर्चेसाठी ठेवले जातील. त्यांनी वित्त व देशातील सद्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत साध्या शब्दशैलीत त्यांची प्रतिक्रिया मांडली.भोंग्याच्या मुद्यावर उदाहरण देताना करायला गेले एक अन् झाले एक असा नकळत टोला त्यांनी राज ठाकरे यांना मारला. तसेच नाशिकची मिसळ सर्वदूर प्रसिद्ध आहे या शब्दात नाशिकच्या मिसळचे कौतुक केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आय.सी.ए.आय, नाशिकचे अध्यक्ष सीए सोहिल शाह यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव सीए संजीवन तांबूळवाडीकर यांनी केले. तसेच सीए इंस्टिट्यूटच्या पश्चिम भारत विभागाचे खजिनदार सीए पियुष चांडक, उप अध्यक्ष सीए राकेश परदेशी, खजिनदार सीए जितेंद्र फाफट, सीए अभिजित मोदी, सीए मनोज तांबे, सीए विशाल वाणी यांचे कार्यक्रम पार पाडण्यास मोलाचे सहकार्य लाभले.

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago