नाशिक

तामसवाडी शिवारात अखेर बिबट्या जेरबंद

नाशिक:

तामसवाडी शिवारामध्ये महिनाभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे अजूनही या भागात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.दोन दिवसांपूर्वी शरद सांगळे यांच्या वस्तीजवळ वन विभागाने पिंजरा लावला होता भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या आज सकाळी सहाच्या सुमारास भश्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजर्‍यात अडकला . बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी वनविभागाला तत्काळ कळविले त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले . या भागात बिबट्यांचा वावर असून एक मादी व 3 बछडे फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरी या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शरद सांगळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे .

हा पाहा व्हिडिओ:

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago