मनोरंजन

‘सूर नवा ध्यास नवा’-पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे कलर्स मराठीवर!

मुंबई :
संपूर्ण महाराष्ट्र ज्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम परत येतोय… तो रंगमंच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण, कलर्स मराठीवर गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांच्या जोडीने पुन्हा महाराष्ट्र अनुभवणार संगीताचा सुरेल नजराणा… आपला आवडता कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे लवकरच सुरू होत आहे.


अजूनही प्रत्येक पर्वात सुरवीरांनी सादर केलेली गाणी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळाले आहे म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या चार पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे पाचवे पर्व. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास मेपासून सुरु होणार आहे. कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये 29 मेपासून रंगणार ऑडिशन्सची फेरी रंगणार आहे. याकरीता वयोगट असणार आहे 15 ते 35. तुम्ही लवकरात लवकर रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचे सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत. या ऑडिशनमधून निवडल्या जाणार्‍या निवडक स्पर्धकांसोबत रंगणार आहे सुरांचं हे अद्वितीय पर्व.
या अनोख्या पर्वात सुरवीरांना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा…. महाराष्ट्राच्या नव्या सुरविराचा! या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. तर सज्ज व्हा, सुरांच्या या नव्या कोर्‍या सुमधुर मैफलीसाठी… सूर नवा ध्यास नवा- पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे!!!
29 मे रविवार (पुणे)
पी. जोग हायस्कूल, 57, छत्रपती राजाराम महाराज पथ, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे – 411029 वेळ : सकाळी 8 ते दु. 4 वा.
31 मे मंगळवार (औरंगाबाद)
देवगिरी महाविद्यालय, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद – 431005 वेळ : सकाळी 8 ते दु. 4 वा.
3 जून शुक्रवार (कोल्हापूर)
गायन समाज देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012 वेळ : सकाळी 8 ते दु. 4 वा.
5 जून रविवार (मुंबई) –
साने गुरुजी विद्यालय,भिकोबा पाठारे मार्ग, कॅटरिंग कॉलेजजवळ, दादर (पश्चिम), मुंबई – 400 028 वेळ : सकाळी 8 ते दु. 4 वा.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago