राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

सूर्यवंशीचे 52 चेंडूंत वादळी विक्रमी द्विशतक

7 चौकार, 28 षटकार ठोकले

दोहा :
भारत ’अ’ संघातर्फे आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने वादळी फलंदाजी केली आहे. वैभव सूर्यवंशीने यूएईविरोधात फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यूएईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 249 धावा केल्या होत्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्माच्या साथीने डावाची सुरुवात केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. वैभवने 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले. या खेळीत वैभवने 28 षटकार आणि 7 चौकार मारले. वैभव सूर्यवंशीने 53 चेंडूंमध्ये 204 धावा केल्या.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत यूएईविरोधात बेबी बॉस वैभव सूर्यवंशीनं 52 चेंडूंमध्ये विक्रमी आणि ऐतिहासिक द्विशतक नोंदवले आहे. लिस्ट -क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतक वैभवने स्वत:च्या नावावर नोंदवले आहे. वैभवने मैदानात सर्वत्र फटकेबाजी
केली.

जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांना टाकले मागे
या विक्रमी शतकासह वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वातील अनेक नामवंत आणि स्फोटक फलंदाजांना मागे टाकले आहे. लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आता तिसर्‍या स्थानावर घसरला आहे. या यादीत भारताच्या साकिबुल गनी याने चौथे स्थान पटकावले असून, भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.

Suryavanshi’s blistering, record-breaking double century off 52 balls

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐका होऽऽ ऐका..

- वासवदत्ता अग्निहोत्री चित्रपटात, नाटकात, जुन्या कथांमधून आपण हे बर्‍याच वेळेस ऐकलेय. अधिकारीवर्ग, दवंडी पिटून…

5 hours ago

दिव्या दिव्या दीपत्कार…

- सुजाता येवले पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे,…

5 hours ago

वेदनेचा बाजार

- सीमाताई मराठे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.…

5 hours ago

डोनाल्ड ट्रम्प-शी जिनपिंग भेट

सहकार्याच्या पडद्यामागे महासत्तांचा संघर्ष! - समाधान कदम जागतिक राजकारणात महासत्तांमधील संघर्षाचे स्वरूप काळानुसार बदलत गेले…

6 hours ago

निती आयोगाचे सल्ले

- राजेश शिरभाते राज्यातील विविध प्रकल्पांसाठी व ते सुरळीत कार्यान्वित होण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे सल्ले काल…

6 hours ago

इगतपुरीत पंचवटी एक्स्प्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी

भाच्याने गमावला पाय; मामाच्या हाताची बोटे तुटली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास…

6 hours ago