43 हजारांचा मुद्देमाल जप्त
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील देवळालीगाव येथील सोमवार बाजार पटांगणात अमली पदार्थांची विक्री करणार्या एका संशयिताला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. संशयिताकडून 32 हजार 460 रुपये किमतीचा 1623.50 ग्रॅम गांजा तसेच मोबाइलसह एकूण 43 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकातील पोलीस शिपाई कुणाल दत्तात्रय घोरपडे यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती. देवळाली गावातील सोमवार बाजार परिसरातील सप्तशृंगी माता मंदिरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा सागर सकट (वय 27) हा विक्रीसाठी गांजा लपवून ठेवत असून, त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. संशयिताच्या घराची झडती घेतली असता, लाकडी कॉटजवळील सोफ्यावर ठेवलेल्या पांढर्या प्लास्टिकच्या पिशवीत गांजाची बोंडे, पाने व फुले आढळून आली. तपासणीत त्यामध्ये 1623.50 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट गांजा असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि मोबाइलही जप्त करण्यात आला. पोलिसांनी सागर सकट याला ताब्यात घेऊन अमली पदार्थाचा स्रोत विचारला असता, त्याने ‘भावड्या’ नावाच्या व्यक्तीकडून गांजा आणल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस शिपाई कुणाल घोरपडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयित सागर सकट व अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.
Suspect selling cannabis arrested in Deolali
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…