स्वमग्नता मनोविकार

श्रद्धा बोरसे-जाधव

आज जागतिक स्वमग्नता दिवस… या अपंगत्वाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून २ एप्रिल हा दिवस शासनाने निश्चित केला. स्वमग्नता जनजागृती दिवस म्हणजेच ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा करतात…
*स्वतःच्याच धुंदीत रहाणे. स्वतःच्याच विश्वात रममाण असणं म्हणजे स्वमग्नता/आॅटिझम…*
ऑटिझम निदान करण्यासाठी कोणतीही टेस्ट नाही. तीन वर्षांच्या मुलाच्या वागण्याच्या पध्दतीवरुन आणि बौद्धिक विकासावरूनच याच निदान करता येते. या मनोविकाराची खात्री करण्यासाठी मुलांची ऐकण्याची आणि नजरेची क्षमता याच परिक्षण डॉक्टरांकडून केली जाते.
डॉक्टर मुलांशी बोलून किंवा पालकांनी सांगितलेल्या लक्षणांवरून ही या आजारचे निदान करू शकतात. यात मुल बोलु पण शकते. अथवा अबोल ही असु शकते. त्यासाठी त्या आजाराबद्दल तेवढे जागरूक असणे गरजेचे आहे. काही पद्धती आणि उपचार वापरून ऑटिझम वर मात करता येते.
या आजारांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना लक्षण लवकर लक्षात येत नाही. तीन वर्षांनंतर प्रखरपणे ही लक्षणं दिसतात. यात मुलं स्वतः च्याच विश्वात रममाण असते. नजरेला नजर देत नाही.
आवाजाला ही प्रतिक्रिया देत नाही. दैनंदिन गोष्टींमध्ये बदल झाल्यास चिडचिड करते. तेच तेच शब्द पुन्हा बोलते. कुठल्या एकाच रंगाचे कपडे परिधान करते. सर्व सामान्य मुलांपेक्षा या मुलांचा बौद्धिक विकास हा कमी गतीने होत असतो. इ.
मुलं ऑटिझम होण्याची कारणे वेगवेगळी असु शकतात. पण काही प्रमुख कारण ती अशी असावी.
अपुरी दिवसांत झालेली प्रसुती.
बाळाचं कमी वजन.
गर्भ अवस्थेत आईला झालेल्या आरोग्य समस्या
मेंदूला झालेला आजार ,
कमी प्रमाणात मिळालेला ऑक्सिजन ई. अशी किंवा कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारची कारण असु शकतात. याच कुठलं एक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यावर उपाय म्हणजे तज्ञांच्या सल्ल्यानेच विशिष्ट औषधे आणि थेरपी यात प्रामुख्याने
फिजिओथेरपी,
ऑक्युपेशनल थेरपी
स्पिच थेरपी,
बिहेवियर थेरपी,
अशा विविध उपचार पद्धतीनी आपण ऑटिझम ग्रस्त मुलांमध्ये योग्य तो बदल घडवून आणू शकतो.
वेळोवेळी डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचा आणि उपचार पद्धतीनी मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येतो. ऑटिझमग्रस्त पाल्याला सांभाळणं म्हणजे धैर्याची परिक्षा आहे.
या विशेष मुलांच्या आहारात बऱ्याच गोष्टी टाळाव्या लागतात. त्यात चॉकलेट, दुध, मैद्याचे पदार्थ, गहू, गोड पदार्थ ई. गोड पदार्थ सेवन करण्याने मेंदूतील कोशिका ह्या आकुंचन पावतात.
ही मुले खाण्या संबंधित प्रकारातही आपली आवड जपताना दिसतात. म्हणुन पालकांना यांच्या आहाराबद्दल सजग राहणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी आहारातून सुटु नये यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.
यात विशेष गोष्टी आहारात घेतल्या तर नक्की फायदा होतो. ओमेगा-3 फैटी एसिड आहारात घेतलं तरी फायदा होतो. यात अक्रोड, माशांचं तेल ई. आहारात समावेश करावा.
तसेच विटामिन सी साठी संत्रा, किवी, अननस, पपई आणि जिंक साठी अंडे, दलिया, डाळीचे पदार्थ यांचा वापर करु शकतो.
पालकांची पहिली जबाबदारी असते. ती म्हणजे स्वमग्न पाल्याचा स्विकार…आणि त्या पाल्याला स्वावलंबी बनविण्यासाठी करायला लागणार प्रत्येक गोष्ट त्याबद्दल सजग आणि जागरूक, प्रयत्नशील असणे.
समाजात याबद्दल पुरेशी माहिती नाही. म्हणुन समाज अशा पाल्याला दुय्यम स्थानच देतो. समाजात याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून हा खारीचा प्रयत्न… खरं तर
स्वमग्नता हा रोग नाही ती तर अवस्था आहे मनाची…

© श्रध्दा जाधव बोरसे

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

15 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

3 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago