महापालिका अतिक्रमण विभागाची लवकरच कारवाई अतिक्रमण
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून येत्या दोन – तीन दिवसांत अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार आहे . यामध्ये मेनरोडसह नाशिकरोड येथील काही भागांचा समावेश आहे . यादृष्टीने महापालिकेच्या वतीने नियोजन सुरू आहे , अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली .
महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी शहर सौंदर्य करण्यावर विशेष भर दिलेला आहे . त्यानुसार त्यांनी पवित्र गंगाघाट परिसर अतिक्रमणमुक्त केले आहे , तर त्या ठिकाणी फक्त पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे . नाशिक शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे .
शहरातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांना अतिक्रमण विभागाच्या वतीने सूचना जारी – करण्यात येऊन आपापल्या भागातील । सर्वांत जास्त अतिक्रमण झालेल्या ठिकाणांची यादी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यानुसार नाशिकरोड तसेच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली असून , सर्व विभागांची माहिती गोळा झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त घेऊन सर्व विभागांचा फौजफाटा एकत्रित करून शहरात भव्य अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे . महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने लवकरच विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे . यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर हातगाडीवाले तसे टपऱ्या आदींमुळे
मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे , अशा ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे . पालिकेने अतिक्रमण मोहीम राबविल्यास मेनरोड परिसर मोकळा श्वास घेणार आहे . मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे परिसरातील रस्ते अरुंद होऊन येथून चालायला देखील रस्ता मिळत नसल्याचे चित्र आहे . सहाही विभागातील अतिक्रमणाची माहिती घेतली जात आहे . गेल्या काही दिवसांत पालिकेने विविध ठिकाणची अतिक्रमणे हटविली आहेत .
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…