परीक्षा घ्यावी ‘नीट’

’नीट’ परीक्षा ही जशी विद्यार्थ्यांची गरज निर्माण झाली तसा त्याचा व्यवसाय झाला. देशाच्या अनेक भागांत या गरजेच्या पूर्ततेसाठी संस्था उभ्या राहिल्या. हा हा म्हणता हा एक मोठा व्यवसाय झाला. त्यामुळे ज्यांना शिक्षणाशी काहीही देणे-घेणे नव्हते त्यांनी याचा चांगला धंदा सुरू केला. कोणताही धंदा म्हटले की, त्यात गैरप्रकार हा आलाच. त्यासाठी मनुष्यबळ आले. त्यासाठी आपल्या संपर्कांचा वापर आला. मोठमोठ्या कंपन्या ज्या प्रकारे मोठ्या पदावरच्या लोकांना आपले जनसंपर्क अधिकारी असल्यासारखे राबवतात त्याचप्रकारे याही धंद्यात झाले. सरकार दरबारी वजन असणार्‍या व्यक्तींचा वापरही करता येऊ शकतो याचा विश्वास निर्माण झाल्यामुळे मग हे गैरप्रकार सुरू झाले. अमुक एका क्लासचे अधिक विद्यार्थी पास होतात हे दाखवण्यासाठी बगलबच्चे कामाला लावण्यात आले. त्यातून पेपरफुटी सुरू झाली. यावेळी त्याचे मोठे स्वरूप पाहायला मिळाले. या एका धंद्यावर कोट्यवधी रुपयांची कशी उलाढाल होते व त्यामध्ये कोण कोण येतात तेही पाहायला मिळाले. याप्रकरणी आता काही लोकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे वरकरणी दिसून येत आहे. त्यावर काय कारवाई होते ते पाहायला हवे. अर्थात, ती कारवाई खरोखर गंभीरपणे होणार आहे का, त्यात खर्‍या गुन्हेगारांना मुळापासून शोधून काढण्यात येणार आहे का, ते एखाद्या विशिष्ट पक्षातले असले किंवा त्यांच्यावर कारवाई सुरू केल्यानंतर ते त्या पक्षात गेल्यास त्यांच्यावरील कारवाई पुढे होणार का, अशा अनेक शंका यानिमित्ताने पाहायला मिळाल्या. या परीक्षेतील गोंधळानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याचा प्रयत्न केला. ही आंदोलने सरकारने ज्या पद्धतीने हाताळली ती पाहता सरकार नेमके विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे का, अशीही शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता यापुढे या देशातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नेमके काय होणार, असाही प्रश्न निर्माण झाला असून, मेलोडी खाओ खुद जान जाओ, असा संदेशच विद्यार्थ्यांना मिळालेला आहे.
वैद्यकीय शिक्षणात केवळ डॉक्टरच व्हायये का की, त्याला इतरही काही पर्याय आहेत यावरही चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी आता आपल्या भवितव्यासाठी विविध पर्याय निवडायला हवेत. शिक्षणासाठी इतर देशांचे पर्यायही आहेत. युक्रेन व रशिया ही राष्ट्रे जरी एकमेकांसमोर असली, तरी आपल्या देशातील बहुसंख्य विद्यार्थी या देशांमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर होत असतात. ते पर्याय गरिबांसाठी मात्र उपलब्ध नाहीत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशही आधीप्रमाणे विशिष्ट लोकांनाच मिळाले तर काही विद्यार्थी कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत. त्यातही अशा प्रकारे प्रवेश घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांनाही बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. सरकारकडे या परीक्षेची पद्धत बदलण्याची मागणी काही तज्ज्ञांनी केली आहे. त्यामुळे आता सरकारने यात
स्वतःचा फायदा पाहून कशा प्रकारे ती घेता येईल याचाही विचार करायला हवा. त्यत प्रश्नपत्रिका फुटण्याचा धोका नाही. ती प्रश्नपत्रिका तिथल्या तिथे बदलता येईल. भारत आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असल्याचे विधान सरकारकडून वारंवार करण्यात येते. ते जर खरे असेल तर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे मानवी बिुद्धमत्तेला संधी देण्यात काय हरकत आहे? सध्याची परीक्षापद्धती चोख व बिनधोक होण्याची शक्यता कमी आहे. परीक्षा म्हटले की, तयारी आली. त्यासाठी मनुष्यबळ व इतर साधनसामुग्री आली.

Take the exam ‘NEET’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *