सर्वतीर्थ टाकेद: शाहबाज शेख
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत मायदरा धानोशी ठोकळवाडी येथील ग्रामस्थांना गेली अनेक वर्ष उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातानात दहा ते बारा किलोमीटर ची पायपीट करावी लागत आहे
इगतपुरी पंचायत समिती कडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करत येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यात आली असून दरवर्षी जाणवणाऱ्या या पाणीटंचाई उपाययोजना करण्यात येऊन कायमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच पुष्पा बांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मायदार धानोशी येथील जवळपास साठ ते सत्तर कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील महिलांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावरून पाणी मिळेल तिथून आणायला लागते त्यासाठी मैलोनमैल प्रवास करावा लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने व विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी गत वर्षी ठोकलवाडीत पाण्यासाठी दोन हात पंप दिले परंतु त्या हातपंपनी पूर्ण तळ गाठल्याने एकाच हात पंपवर संपूर्ण ठोकळवाडी तेथील ग्रामस्थ नंबर लावून पाणी भरतात या हात पंपपानी तळ गाठल्याने दर अर्ध्या तासाला एक हंडाभर पाणी मिळते पाण्यासाठी सर्व गावकरी हंडा , कळशी, भांडी यांनी नंबर लावून ठेवतात घरी निघून जातात एकमेव पर्याय पण त्यालाही पाणी नसल्याने दिवस-रात्र हा पंप सुरू असतो परंतु यातून पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे
दरवर्षी उन्हाळ्यात चार-पाच महिने वाडीतील महिलांना कायमस्वरूपी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे ही परिस्थिती वर्षानुवर्षे अशी चालू आहे या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामविकास अधिकारी नितेश हेबाडे यांनी गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड यांची भेट घेत पाणी टँकर च्या मागणीचा प्रस्ताव दिला होता त्यांच्या या मागणीला यश आले असून इगतपुरी पंचायत समितीकडून पाणीपुरवठा करण्यात आला आहे
दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र एकमेव असलेल्या हातपंप नंबर लावून वेळ खर्च करून रात्रीअपरात्री जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागते आहे पाणी टंचाई व शासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येऊन पाणीप्रश्न कायमचा सोडण्यात यावा
पुष्पा बांबळे
सरपंच
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…