नाशिक:
तामसवाडी शिवारामध्ये महिनाभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे अजूनही या भागात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.दोन दिवसांपूर्वी शरद सांगळे यांच्या वस्तीजवळ वन विभागाने पिंजरा लावला होता भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या आज सकाळी सहाच्या सुमारास भश्याच्या शोधात आलेला बिबट्या पिंजर्यात अडकला . बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी वनविभागाला तत्काळ कळविले त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले . या भागात बिबट्यांचा वावर असून एक मादी व 3 बछडे फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरी या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शरद सांगळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे .
हा पाहा व्हिडिओ: