नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.17 मे रोजी प्रभाग रचना जाहीर होणार होती मात्र शनिवार (दि.14) रोजी महानगर पालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.प्रारूप प्रभाग रचनेतील हरकतीमुळे 7 प्रभागातील रचनेत फेरबदल करण्यात आले आहेत.43 प्रभागात 133 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुक फेब्रुवारीमध्ये होणे अपेक्षित होते.मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती.आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने निवडणुक तयारीला वेग आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांकडून निवडणुकच्या तयारीला वेग येणार आहे.