नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मनपाच्या निवडणुकीत रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जागावाटपाची ओढाताण आणि उमेदवारी पटकवण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. काही पक्षांनी एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. तर काही पक्षांमध्ये अजूनही जागावाटपावरून घमासान सुरू आहे. मात्र, एकदा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराला खरी रंगत येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तपोवनाचा मुद्दा आणि गुन्हेगारी हे हॉट विषय ठरणार आहेत.
कोणतीही निवडणूक असली की प्रचारात अनेक मुद्दे समोर येतात. या मुद्यांभोवतीच प्रचार फिरत असतो. सत्ताधार्यांबरोबरच विरोधकांकडूनही याच मुद्यांंवर भर देऊन मतदारांचे लक्ष वेधले जाते. मागील वेळेस ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दत्तक घोषणेचा परिणाम होऊन नाशिककरांनी मनसेची सत्ता उलथवत भाजपाला बहुमत दिले होते. यंदाची मनपा निवडणूक तपोवनातील वृक्षतोड, गुन्हेगारी, खड्डेमय नाशिक, पदाधिकारी फोडाफोडी, पालकमंत्रिपद न नेमणे या मुद्याभोवती फिरण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा शिवसेनेला या मुद्यावर घेरण्याची रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे.
तपोवनाच्या मुद्द्यावरून नाशिक शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, राजकीय पक्ष यांच्यासह सामान्य नागरिकदेखील तपोवन वृक्षतोडीच्या विरुद्ध आक्रमक झाले आहेत. याच मुद्यावरून प्रचारात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस
नाशिक शहराच्या प्रत्येक मनपा निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये सामना रंगत असतो, हे मागील दोन निवडणुकीवरून दिसून आले. 2017 च्या मनपा निवडणुकीत नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. यात भाजपाने बाजी मारली होती. तर 2012 च्या मनपा निवडणूक तात्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगला होता. यात मनसेने जोरदार यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फडणवीस विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना रंगणार असून, यात कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…