नाशिक

स्वच्छतादूतांकडून गोदावरी चकाचक

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक तीर्थक्षेत्री पुढील वर्षात जागतिक दर्जाचा सिंहस्थ कुंभमेळा 2027 महोत्सव भरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हायटेक तसेच पर्यावरणपूरक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्था व आदिवासी सेवा समिती, नाशिक संस्थाअंतर्गत नाशिक कॅम्पसमधील महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
याचाच भाग म्हणून संस्थेच्या वतीने ‘पावन गोदावरी-स्वच्छ गोदावरी-सुंदर गोदावरी’चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील गोदावरी नदी व गोदाघाट भागात काल रविवारी (दि. 28) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सुमारे 250 किलोवर कचरा व प्लास्टिकचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अपूर्व हिरे यांनी दिली. त्याचवेळी संस्थेंतर्गत पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षक-शिक्षकेतरांसह एनएसएस-एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेस रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व नाशिक फ्लॉगर्स यांचे बहुमोल सहकार्य लाभले. गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या पटांगणात काल सकाळी संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी डॉ. अपूर्व हिरे बोलत होते. याप्रसंगी दीपक भगत, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य, शिवाजी दादा बोंडार्डे, चैतन्य गायधनी, अक्षय शेरताटे, इस्कॉन परिवाराचे नृसिंह कृपादास महाराज, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संचलित हिरे नॉलेज कॅम्पस, फार्मसी महाविद्यालय, कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय व रुग्णालय, पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी, पंचवटी कॉलेज तसेच एक्सेल हाय इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आदी शिक्षण संस्थांचे प्राचार्य व पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र भांबर, डॉ. बी. एस. जगदाळे, डॉ. संतोष तांबे, डॉ. चंद्रकांत दिघावकर, डॉ. प्रमोद कातकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. यादव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Godavari gets a makeover from cleanliness ambassadors
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago