तरुणीची दुचाकी घुसली थेट एटीएममध्ये

सीसीटीव्ही मध्ये कैद झाली घटना

सिडको वार्ताहर
सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बॅकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणी कडून गाडीवरील ताबा सुटल्याने मोपेड दुचाकी एटीेएम मध्ये घुसून तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात दाखल केले आहे.

सदर ची घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

गौरी प्रदीप सैदाने वय वर्ष १८ रा. खांडे मळा, सावता नगर, सिडको असे मुलीचे नाव असून गौरी ही सकाळी ९.३० च्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली असता तिचा आपल्या गाडी वरचा ताबा सुटल्याने तिच्या कडून गाडी डायरेक्ट समोरच असलेल्या एस.बी.आय च्या ATM मध्ये घुसली तसेच या अपघाता मध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सदरची घटनेची माहिती कळताच अंबड पोलिस स्टेशन चे कर्मचारी तेथे दाखल झाले. तसेच पोलिसांनी ही माहिती एस बी आय बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारी देखील दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *