गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’ वर कोयत्याने वार

गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू  आर्टीस्ट’ वर कोयत्याने वार

मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार…

पंचवटी – प्रतिनिधी
गोदाघाट परिसरातील दुतोंडी हनुमानाजवळील अमृततुल्य चहाच्या शटरजवळ झोपलेल्या वैभव आश्रुबा नरवाडे या युवकावर रविवारी पहाटे दोन वाजता दोघांनी कोयत्याने वार केले. नरवाडे हा मरण पावल्याचे समजून हल्लेखोर पसार झाले. मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले असून उपचार सुरू आहेत.

शहरातील नामचिन गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचललेली असताना आता नवीन चेहरे समोर येत आहेत. ही गुन्हेगारांची नवी ‘मोडस् अॉपरेंडी’ मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव अश्रुबा नरवाडे (वय २६, रा. तारवाला नगर, लामखेडे मळा, पिंपळेश्वर महादेव मंदीराचे बाजुला, दिंडोरी रोड) हा युवक रविवारी मध्यरात्री दुतोंड्या मारूती जवळील अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळील शटरजवळ झोपला होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्याच्या डोक्यावर जोरात घाव घातला गेला. त्यामुळे जाग आलेल्या नरवाडेने पाहिले असता रोशन चारोस्कर याच्या सोबत काम करणारे कृष्णा पांडे आणि साथीदाराच्या हातात कोयते दिसले. नरवाडे जागा झाल्याचे पाहून दोघांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रतिकारास न जुमानता उजव्या हातावर, डाव्या पायावर वार केले. त्यानंतर नरवाडे मेला आहे, असा समज झाल्याने हल्लेखोर पळून गेले.

गोदाघाटावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सुनिल पवार, सहायक सतिष शिरसाठ, शरद पाटील, उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमी नरवाडे यास रुग्णालयात हलवले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पांडेसह दोघांवर खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago