निफाड नगरपंचायतीची विकासकामांसाठी धडक वसुली मोहीम
निफाड : विशेष प्रतिनिधी
नगरपंचायतीस आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच वित्त आयोगाचा निधी, शासनाकडून मिळणारी अनुदाने मिळविण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची वसुली करणे बंधनकारक आहे. मात्र, निफाड नगरपंचायतीकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली कमी असून, वसुलीसाठी नगरपंचायत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कर भरण्याचे आवाहन केले आहे.
नगरपंचायतीची मालमत्ता करवसुली 45 टक्के झाली असून, पाणीपट्टी वसुली 30 टक्के झाली आहे. या उत्पन्नावरच पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती आदींचे नियोजन अवलंबून असते. शासनाकडून मिळणार्या योजनांच्या निधीसाठीही उत्पन्नाचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. नागरिकांनी कर भरल्यास विकासाला गती मिळू शकते.
निफाड शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, विविध विकासकामे ही नगरपंचायत करावरच अवलंबून असल्याने नागरिकांनी कर भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे.
-कांताबाई कर्डिले, नगराध्यक्षा, निफाड
Tax collection is mandatory for government grants.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…