सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील बारागावपिंप्री शिवारात दोन कारची समोरासमोर धडक होऊन देशवंडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका भीमाबाई छगनदास बैरागी (48) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.8) सकाळी सुमारे 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात त्यांचा नऊ वर्षीय मुलगा वरद मनोज बैरागी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भीमाबाई बैरागी या आपल्या मुलगा वरदला सोबत घेऊन अल्टो कार (क्र. एमएच 15 जीएल 5197)ने सुळेवाडी फाटामार्गे देशवंडीकडे जात होत्या. बारागावपिंप्री शिवारातील ज्ञानेश्वर गोराडे यांच्या शेताजवळ समोरून येणार्या स्विफ्ट कार (क्र. एचएच 01 बीजी 4004)ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बैरागी व त्यांचा मुलगा वरद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत करत दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच भीमाबाई बैरागी यांचा मृत्यू झाला. वरदच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अपघातानंतर स्विफ्ट कारचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कृष्णदास छगनदास बैरागी (35) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार वाघ करीत आहेत. भीमाबाई बैरागी या ब्राह्मणवाडे केंद्रातील देशवंडी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त
होत आहे.
Teacher dies in horrific two-vehicle accident; son critically injured
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…