पंचवटी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ भविष्यातील औद्योगिक गरजा लक्षात घेऊन केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता कौशल्याधारित, प्रत्यक्ष व उद्योगाभिमुख शिक्षणावर भर देत आहे, असेे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ यांनी केले.
नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत स्व. अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ प्रायोजित राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर स्व. अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश अण्णाजी पाटील, सचिव डॉ. अक्षय सुरेश पाटील, प्राचार्य गोपाल वडनेरे आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी (डिप्लोमा) विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान, अचूकता व स्पर्धात्मक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गोपाल वडनेरे यांनी, नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. अशा शैक्षणिक व सहअभ्यासक्रमात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात आणि यश-अपयश स्वीकारण्याची सकारात्मक वृत्ती निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. सचिव डॉ. अक्षय पाटील, यांनी संस्थेच्या शैक्षणिक व एकूण प्रगतीचे कौतुक करत राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आभार मानले. या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर, नांदेड, अहिल्यानगर, बीड, कोपरगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक येथील एकूण 25 संघांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक फेरीत तांत्रिक ज्ञान, वेगवान विचारशक्ती व अचूक उत्तरांची चुरस पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निकालात 15 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक के. के. वाघ पॉलिटेक्निक, नाशिक येथील उदय शांताराम अडके व अथर्व दीपक पाटील यांनी पटकावले. दहा हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक संदीप पॉलिटेक्निक, नाशिक येथील सूरज भूषण सोनावणे व प्रसाद धनंजय दंडगव्हाळ यांनी मिळवले. पाच हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर येथील गोहिते शिवांश मरोटी व गिमोंकार सक्षम अनंत यांनी पटकावले. प्रा. पंकज पाठक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम समन्वयक प्रा. स्वाती सोनजे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. नितीन हिवाळे, प्रा. धनश्री धनवटे, प्रा. विशाखा साबळे, प्रा. श्रुती बुनगे, प्रा. आरती हिरे व प्रा. स्नेहा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजूषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांत तांत्रिक ज्ञान, स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास व शैक्षणिक उत्कृष्टतेला नवी दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
Technical Education Board focuses on industry-oriented education: Dandagawhal
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…