नाशिक

गंजमाळला आगीत दहा घरे खाक; सव्वा तासानंतर आग आटोक्यात

♦  लाखोंचे नुकसान, संसारोपयोगी वस्तू भस्मसात 

♦  भंगार गोदामामध्ये शॉर्टसर्किट

नाशिक : प्रतिनिधी
येथील शालिमार परिसरातील गंजमाळमधील पंचशीलनगर झोपडपट्टीत शुक्रवारी (दि.21) सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. बघता-बघता ही आग वेगाने पसरली. त्यात दहा घरांमधील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान, येथील भंगार गोदामामध्ये आग लागून ती आजूबाजूच्या घरांमध्ये पसरल्याचे बोलले जाते. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला देताच सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. सव्वा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी नऊ वाजता आग आटोक्यात आणली.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गंजमाळ येथे शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास भंगार गोदामामध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याचे बोलले जाते. दरम्यान, गंजमाळमधील पालकमुलांना शाळेत सोडण्याची तयारी करीत असतानाच आग लागल्याचे लक्षात आले. आगीत नुकसान झालेल्या घरांच्या मध्यभागी भंगार साहित्याचे गोदाम असल्याने आगीची झळ वाढली. स्थानिक नागरिकांच्या घरातील कपाटे, कागदपत्रे, पैसे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गोळ्या-औषधे, पलंग, गादी व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिका अधिकारी, तसेच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
झोपडपट्टीत एकाच रांगेतील सात घरांसह एक किराणा दुकान व भंगाराचे गोदाम आगीत भस्मसात झाले. सर्वच घरे व गोदाम पत्र्याचे असल्याने आगीची तीव्रता वाढली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. झोपेत असलेल्या काहींना व लहान मुलांना ताबडतोब घराबाहेर काढण्यात यश आले.

2018 मध्येही आगीची घटना

यापूर्वी गंजमाळ परिसरात 2018 मध्ये आग लागून सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला होता. गंजमाळच्या भीमनगरमध्ये ही घटना घडली होती. शुक्रवारची (दि. 21) घटना पंचशीलनगरमध्ये घडली. सात वर्षांपूर्वीच्या आगीची उपस्थितांना आठवण झाली.

भंगार गोदामामधूनच सुरुवात

पंचशीलनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीची सुरुवात भंगार गोदामामधूनच लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींसह अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. या गोदामामधून ही आग आजूबाजूच्या व पाठीमागच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. मात्र, अग्निशमन दल व नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली.

दहा सिलिंडर हलवल्याने अनर्थ टळला

जेथे आग लागली त्या दहा घरांत भरलेले दहा सिलिंडर होते. त्यांचा स्फोट होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून सर्वांत आधी सिलिंडर बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. शिवाय बालकांनादेखील तातडीने घराबाहेर काढले.

भंगार गोदाममध्ये शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. गंजमाळ परिसराजवळच अग्निशमनदलाचे मुख्य कार्यलय असून, तेथे 7.45 वाजता माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ दोन बंब व त्यापाठोपाठ पाच बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. एकूण 40 कर्मचार्‍यांनी सव्वा तासात दहा घरांची आग आटोक्यात आणली.
– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago