मृतांत कामगार, उद्योजकाच्या कुटुंबाचा समावेश
सोलापूर :
शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी पहाटे टॉवेलच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखान्याच्या मालकासह कुटुंब आणि कामगार अशा आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या आगीची तीव्रता इतकी होती की शंभराहून अधिक अग्निशमन दलाच्या वाहनांच्या फेर्या होऊनही आग आटोक्यात येत नव्हती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र, तीन जणांचा जागीच, तर पाच जणांंना बेशुद्धावस्थेत बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. मृतांत पाच पुरुष, दोन महिला आणि एका सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल हा टॉवेल कारखाना आहे. कारखान्याच्या वरच्या मजल्यावर कारखान्याचे मालक राहतात. तर खाली कामगारांना राहण्यासाठी खोल्या काढलेल्या आहेत
आग लागताच टॉवेल आणि इतर कच्च्या मालामुळे आगीने भीषण रूप धारण केले. त्यामुळे घरात अडकलेल्यांना बाहेर काढणे मुश्किल झाले होते. भिंत तोडून घरात अडकलेल्या मंडळींना बाहेर काढावे लागले. आगीपासून बचावासाठी सर्व पाच जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आला नाही. त्यामुळं श्वास गुदमरून आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व आठही मृतदेह हे र् शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
आईच्या कुशीतच बाळाने जीव सोडला
महाभंयकर आगीपासूनच्या बचावासाठी शीफा मन्सुरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतले होते.
युसूफ मन्सुरी हा एक वर्षाचा चिमकुला आपल्या आईच्या कुशीत होता,
पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला.
या अत्यंत ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण सोलापूर शहर हळहळले आहे.
दरम्यान, शर्थीच्या प्रयत्नांनंतर 14 तासांनी संध्याकाळी
पाचच्या सुमारासआग नियंत्रणात आली होती.
संपूर्ण परिसर इंडस्ट्रिअल एरिया असल्याने दुसर्या कारखान्याना
याचा फटका बसू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागले.
पाच लाख रुपयांची मदत
या दुर्दैवी घटनेची दखल घेत,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता
निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य
देणारअसल्याचे जाहीर केले आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…