धार्मिक राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्‍न महत्वाचे : खा. सुप्रिया सुळे

सुसंस्कृत महाराष्ट्राची ही संस्कृती नाही

नाशिक : प्रतिनिधी

सद्याच्या राजकारणात धार्मिक, जातीय तेढ निर्माण केला जात आहेे. भोंगे, औरंगजेबाच्या थडगीवर जाऊन दर्शन घेणे, हनुमान चालिसा या मुद्यांपेक्षाही महागाईचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे, त्यासाठी केंद्राने पाऊले उचलण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा सद्या गैरवापर सुरू आहे. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार झालेले आहेत. राजकारणाच्या 55 वर्षांत हल्ले होऊनही माझ्या वडिलांनी कोणाला असे उत्तर दिले नाही. कोणाच्या वडिलांनी मरावे, असे बोलणे कोणत्या संस्कृतीत बसते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. सुप्रिया सुळे या रविवारी नाशिकच्या दौर्‍यावर होत्या. त्यावेळी हॉटेल एमराल्ड पार्क येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या आक्षेपार्ह रिट्विटमुळे तिच्या विरोधात भूमिका घेणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी वाद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येण्याची साद त्यांनी घातली

केतकी चितळेला ओळखत नसल्याचे सांगून माध्यमांचा गैरवापर होत असल्याचे सांगितले न्याय मागण्यासाठी माध्यमे हे माध्यम नाही. वादग्रस्त विधानांसाठी अमोल मिटकरी यांनाही नोटीस आली असल्याचे सांगताना खा. पवारांविरोधात बोलणार्‍यांना धडा शिकवण्याची भाषा करणार्‍या राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांना समज दिली जाईल असे सुळे यांनी सांगितले.कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या पटोलेंच्या वक्तव्यावर बोलताना सुळे यांनी घरात भांड्याला भांडे लागते असे वाद जगासमोर आणणे चुकीचे असल्याचा कॉंग्रेसला टोला लगावला.गृहमंत्री अनिल देशमुख आतापर्यंत त्यांच्याकडे केंद्रसरकारने 109 रेड टाकून विक्रम केला. तत्पूर्वी 108 वेळा टाकली असताना त्यांना काहीच सापडले नसावे का? असा प्रश्नही उपस्थित केलाअयोध्येला जाण्याचा किंवा अयोध्येला दौरे काढण्यात चूक काय? काश्मीर ते कन्याकुमारी सर्वांनी देशाटन पर्यटन केले पाहिजे. भारत एक खोज हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे पुस्तक हेच दर्शवते. भारताची संस्कृती पाहण्यासाठी सर्व देश फिरला पाहिजे. राज ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्या अयोध्या दौर्‍याबाबत खासदार सुळे यांनी देशात अनेक चांगल्या गोष्टी असून प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येकाने देशातील चांगल्या गोष्टी पाहण्याचा सल्ला देतांना अयोध्या दौर्‍यावर जाण्यात चूक काय असा प्रश्न उपस्थित केला. ताजमहालचा वाद निरर्थक असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.या पत्रकार परिषदेला आमदार हेमंत टकले, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *