आस्वाद

तो दीन… तिचा महिला दिन

नवीन नाका गंगापूर रोड कॉर्नरला एक नाश्ता केंद्र आहे. सकाळी आठ वाजता गरमागरम घरगुती पदार्थांचा दरवळ परिसरात दरवळत असतो.. पोहे, उपमा, वडा, इडली-सांबार इत्यादी इत्यादी. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी हमखास तिथे आस्वाद घेताना दिसतात. स्वच्छताही वाटली. मालक तिशीतला युवक शिकलेला वाटत होता. बोलणेही मृदु होते.
मला राहवले नाही. मला वाटले नक्की कुणी सुगरण असावी त्याची आई किवा बायको घरी बनवून देत असणार त्याशिवाय अशी खास चव कशी येणार? त्याचे उत्तर ऐकून मला त्याचे एकदम कौतुक वाटले. रोज पहाटे चार वाजता उठून तो सारे किचन उरकून लवकर हजर होतो. फक्त एका कामगार मुलाची मदत असते. बायको दोन छोट्या मुलांना घेऊन गावाकडे राहते. मुलांच्या शिक्षणासाठी तो असे पैसे पाठवत असतो. माझे मृदु शब्द त्याच्या काळजाला भिडले असावे.
तो म्हणाला, वाटते तितके सोपे नाही माझ्यासाठी हे सर्व, पण काही इलाजही नाही. पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा पुनश्च हसरा झाला. आणि तो कामालाही लागला.
आईचे गुणगान सगळे जग नेहमीच गात असते. पण असे बापही असतात की, ते केवळ मुलांसाठी खूप काबाडकष्ट करत असतात. तशी ती जगरहाटी असते.
तिचा महिला दिनाला सन्मान होतो, पण तिला सावरणारा तोही तितकाच आपले योगदान देत असतो. त्याच्यावर नेहमीच जबाबदार्‍यांचा डोंगर असतो. सोपे तर काहीच नसते त्यांच्यासाठी. जगण्याची लढाई दोघांना आहेच. यासाठीच वाटते की, महिलांनी स्वतःचा इतका उदो उदो का करवून घ्यावा? नाते तर दोघांचे पूरक आहे. एकमेकांविना अपूर्ण आहे, तरीही काही मूठभर स्त्रिया अशा असतात की, ज्यांना स्वतःच्यापलीकडे जग दिसतच नाही. आत्मसन्मान वगैरे ठीक आहे, पण अतिरेक नको असे मनापासून वाटते.

That poor… her Women’s Day

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago