शहराच्या दुरवस्थेला प्रशासन जबाबदार

शिवसेना गटनेते बोरस्ते : विशेष महासभा न घेतल्यास जनसभा घेऊ

नशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराची संपूर्ण वाताहत झाली असून, दररोज नाशिककरांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केला. दरम्यान, या प्रश्नावर विशेष महासभा बोलवावी, याकरिता स्थायी समिती सदस्यांनी महापौरांना पत्र दिले आहे. दरम्यान, विशेष महासभा घेण्याचे टाळले तर प्रशासनाविरोधात नाशिककरांसमवेत जनसभा घेईल व तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही बोरस्ते यांनी
दिला आहे.
शहरात भाजप-शिवसेनेची युती असली तरी सध्या शहरातील रस्ता प्रश्नावरून सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते आहे. दरम्यान, याच प्रश्नी पक्षाचे गटनेते बोरस्ते यांनी भूमिका मांडत विशेष महासभा घेऊन ज्यांच्यामुळे शहरावर ही परिस्थिती ओढावली आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अन् हा निर्णय महासभेतच व्हावा तरच विशेष महासभेला महत्त्व राहील. शहराची अवस्था काय आहे, हे सांगणे कठीण झाले आहे. प्रशासनाने नेमके केले तरी काय, यावरून प्रश्न उपस्थित होतो आहे. नागरिकांना त्रास होत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही. त्यामुळेच आम्ही विशेष महासभेची मागणी केली आहे. याबाबत गटनेत्यांचीदेखील बैठक झाली आहे. प्रशासनाची दिरंगाई म्हणा किंवा दुर्लक्ष, मात्र नागरिकांना रस्त्यांचा त्रास होतोय. त्यासाठी लोकप्रतिनिधींना नागरिक जबाबदार धरत आहेत. म्हणूनच याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी विशेष महासभा घेऊन संबंधितांवर कारवाई झालीच
पाहिजे.

सत्तेत असलो तरी जनतेला रस्त्यावर उतरू
शहरात 28 ठिकाणी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ताकामे सुरू आहेत. मात्र, सदर कामे पाहता अगदी कासवगतीने सुरू असून, नाशिककरांना वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. नागरिकांचे खड्ड्यात जीव जात असल्याने प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. विद्यमान स्थितीत या रस्त्यांची कामे पन्नास टक्क्यांपर्यंत होणे अपेक्षित होती. परंतु, सद्यस्थितीत फक्तएक-दोन कामे 31 टक्क्यांपर्यंत झाली असून, उर्वरित 26 रस्त्यांची कामे वीस टक्क्यांच्या आत अडकली आहे. याचा मात्र नाशिककरांना तीव्र मनस्ताप होतो आहे. – अजय बोरस्ते, गटनेते, शिवसेना

युटिलिटीच्या कामांचीही बोंबच
शहरात एमएनजीएल, बीएसएनल, सीसीटीव्हीसह इतर कारणांसाठी लाइन खोदली आहे. प्रशासनाने वेळोवेळी दावा करूनही अद्याप त्यांना युटिलिटीची कामे करता न आल्याने कमालीचा त्रास या कामांचा होतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनानेच वेगवेगळी मुदत देत ही कामे करण्याचा दावा केला. मात्र, मुदतवाढ देऊनही ही कामे सर्वत्रच अपूर्णावस्थेत आहेत.

The administration is responsible for the city’s deplorable condition.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *