– श्याम ठाणेदार
11 ऑक्टोबर हिंदी चित्रपटसृष्टीचा शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. 11 ऑक्टोबर 1942 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले, तरी ते बच्चन या टोपणनावाने कविता प्रसिद्ध करीत. त्यामुळे अमिताभ यांनीही चित्रपटसृष्टीत आल्यावर बच्चन हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरण्यास सुरवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
अमिताभ बच्चन यांचे शालेय शिक्षण अलाहाबाद येथील ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे झाले. दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी कोलकाता येथे एका कंपनीत काम केले, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. तेथून ते मुंबईत आले आणि चित्रपटात कामाच्या संधी शोधू लागले. अमिताभ बच्चन यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात संधी मिळाली. दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. अमिताभ यांचाही म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, शशी कपूर अशा देखण्या नायकांची चलती होती. अशा काळात अमिताभ तग धरतील का? अशी साशंकता होती. त्यात त्यांचा पहिलाच चित्रपट जोरदार आपटला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. सलग सात चित्रपट आपटूनही ते डगमगले नाहीत. 1973 मध्ये आलेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर या चित्रपटाने अमिताभ यांना खरा ब्रेक मिळवून दिला. या चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका खूप गाजली. या चित्रपटानंतर त्यांची अँग्री यंग मॅन अशी जनमानसात प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळेच त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त आवाज आणि अनोखी अभिनय शैली यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच सुपरस्टार पदावर पोहोचले. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद चित्रपटात त्यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. 70 आणि 80 चे दशक अमिताभ बच्चन यांनी अक्षरशः गाजवून सोडले. दिवार, शोले, अभिमान, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुक्कदर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नशीब, लावरीस, सिलसिला, नमक हलाल, कुली, शराबी, खुद्दार, अग्निपथ असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता आजतागायत कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. अमिताभ बच्चन हे त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. मिस्टर नटवरलाल चित्रपटातील पाश्वर्र्गायनासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. 1984 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र, हा आपला प्रांत नाही हे लक्षात येताच त्यांनी राजकारणाला रामराम केला. आज ते वयाची 84 वर्षे पूर्ण करत असले तरी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे.
The Birthday of the Great Leader
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…