युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
लासलगाव: वार्ताहर
देवगाव ता.निफाड येथील २२ वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
देवगाव येथील पोलीस पाटील सुनिल बोचरे यांनी खबर दिली की,राहुल भाऊसाहेब मेमाने वय २२ हा
दि.१७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून देवगाव येथुन बेपत्ता झाला होता.त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत असताना दि.१८ सप्टेंबर रोजी सायं ६ वाजता तो दगु लुकाजी मेमाने यांचे मालकीचे शेतातील विहिरीत मयत स्थितीत मिळुन आला आहे बाबतचे खबरीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात अ.मृ.नोंद दाखल करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.