नाशिक

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव?

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश येत असताना, त्यात आता 16 ग्रामपंचायतींचा कचरा थेट मनपाच्या विल्होळी येथील कचरा डेपोवर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अद्याप या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर दाखल झालेला नसला, तरी लवकरच तसा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे. इगतपुरी व नाशिक या तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा कचरा
महापालिकेच्या विल्होळी भागात आणण्याची तयारी आहे.
मनपाच्या माध्यमातून विल्होळी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. खासगीकरणातून हा प्रकल्प चालवला जात आहे. नाशिकच्या हद्दीलगतच्या गावांत मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभे राहिले आहेत. यामुळे तेथील कचर्‍याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरण हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प तयार होत आहेत. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींकडे त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हा कचरा विल्होळीच्या प्रकल्पावर आणण्याची तयारी आहे. नाशिक व इगतपुरी पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या 16 गावांचा घनकचरा स्वीकारण्याबाबत महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. पण हा प्रस्ताव अपूर्ण असल्याने मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दोन्ही पंचायत समित्यांकडून सविस्तर माहिती मागवली असता, त्यात अनेक ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र व्यवस्थाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ओला व सुका असा एकत्रित कचरा महापालिका स्वीकारणार का? कारण नाशिक महापालिकेकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आजमितीस महापालिकेमार्फत शहरातील कचर्‍याची पूर्णपणे विल्हेवाट लावली जात नसताना बाहेरील कचर्‍यामुळे मनपाची व्यवस्था कोलमडू शकते. तसेच कचरा विलगीकरणाचाही प्रश्न उपस्थित होणार आहे.

The burden of waste from 16 gram panchayats within the municipal limits?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

2 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

3 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

3 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

3 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

3 hours ago

स्व. डॉ. वसंतराव नगरकर : बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नाशिकरोडच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, तसेच ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, आपल्या मनमिळाऊ…

4 hours ago