नाशिक

चाळीस दिवसांत 245 कोटींच्या वसुलीचे आव्हान

जमीन महसुलाची 95 कोटी, तर गौणखनिजाची 136 कोटी वसुली

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने 16 फेब्रुवारीपर्यंत 232 कोटी 35 लाख 6 हजार रुपयांची महसूल वसुली केली आहे. एकूण वसुलीच्या तुलनेत हे प्रमाण 48.63 टक्के आहे. त्यात जमीन महसुलाचे 95 कोटी 36 लाख 35 हजार रुपये, तर गौणखनिजाच्या 136 कोटी 98 लाख 70 हजारांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. आर्थिक वर्ष संपायला अवघे 40 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे या कालावधीत 245 कोटी 40 लाख 62 हजार रुपये वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

राज्य शासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी 477 कोटी 75 लाख 68 हजार रुपयांचे महसूल उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामध्ये जमीन महसुलाचे 227 कोटी 75 लाख 68 हजार तसेच गौणखनिजाच्या 250 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या वर्षीशी तुलना केल्यास जिल्ह्याच्या उद्दिष्टात यंदा 175 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यस्तरावरून दरवर्षी साधारणत: ऑगस्ट महिन्यात जिल्हा प्रशासनांना महसूल उद्दिष्ट ठरवून दिले जाते. पण यंदाच्या वर्षी सप्टेंबरअखेरीस उद्दिष्ट कळविण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्ह्याच्या उद्दिष्टात भरघोस वाढ केली गेली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण उद्दिष्ट 273 कोटी 73 लाख 10 हजार रुपये होते. त्यात जमीन महसुलाचे 73 कोटी 10 लाख 64 हजार, तर गौणखनिजचा 200 कोटींचा वाटा होता. मार्चअखेरीस प्रशासनाने उद्दिष्टाच्या तुलनेत जवळपास 150 टक्के वसुली केली होती. त्या तुलनेत चालू वर्षी आता शासनाने उद्दिष्टामध्ये थेट 204 कोटी 11 लाख 58 हजारांची वाढ केली आहे.

निवडणुकीमुळे वसुलीला ब्रेक

जिल्ह्यात नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे महसूल विभागातील असंख्य अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत अडकून पडल्याने वसुलीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी उद्दिष्टपूर्ती होणार का, हे पाहावे लागणार आहे.

यंदा शासनाकडून उद्दिष्टात वाढ

मागील चार वर्षांचा अनुभव बघता जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिकची वसुली केली आहे. पण यंदा शासनाने उद्दिष्टात जवळपास 175 टक्कयांनी वाढ केली आहे. मार्चएंडसाठी अवघा चाळीस दिवसांचा कालावधी शिल्लकराहिला आहे. अशा परिस्थितीत उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाला 245 कोटी 40 लाख 62 हजारांची वसुली करावी लागणार आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

9 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

9 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

9 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

9 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

10 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

10 hours ago